शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TVS ची भन्नाट ऑफर! केवळ १,५५५ रुपये भरा आणि घरी घेऊन जा ‘या’ दमदार बाइक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 4:23 PM

1 / 10
एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सामान्य नागरिक अगदी त्रस्त झाले आहेत.
2 / 10
मात्र, हळूहळू पूर्वपदावर येत असलेल्या ऑटोमोबाइल क्षेत्रातही कंपन्या आपले नवीन मॉडेल्स, डिस्काऊंट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
3 / 10
गेल्या काही वर्षात टू-व्हिलरला मोठी मागणी असल्याचे दिसत आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंधनदरवाढ. मात्र, कोरोनामुळे टू-व्हिलरची मागणी घटल्याचे दिसून येत आहे. यातच देशातील प्रमुख टू-व्हीलर कंपनी TVS ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.
4 / 10
TVS ने आपल्या तीन बाइक्सवर १०० टक्के फायनान्स आणि ईएमआयची ऑफर आणली आहे. या तिन्ही बाइक्सवर १०० टक्के फायनान्सची सुविधा कंपनीकडून मिळेल. याशिवाय दरमहा फक्त १,५५५ रुपये ईएमआयची ऑफरही आहे.
5 / 10
याशिवाय ग्राहकांकडून प्रोसेसिंग फी देखील आकारली जाणार नाही. तसेच ग्राहकांना या तीनही बाइक्सच्या खरेदीवर ५ हजार रुपये बचत करण्याची संधी मिळू शकेल. TVS ची ही ऑफर स्टार सिटी प्लस, रेडियॉन आणि स्पोर्ट या तीन बाइकवर आहे.
6 / 10
TVS Sport ही बाइक कंपनीच्या बेस्ट सेलिंग बाइक्सपैकी एक आहे. यामध्ये १०९.७ सीसी क्षमतेचे इंजिन असून ही बाइक ७५ किलोमीटरपर्यंत मायलेज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या बाइकचा सर्वाधिक वेग ९० किमी प्रति तास आहे. याची किंमत ५६ हजार १३० रुपये एक्स-शोरुम आहे.
7 / 10
TVS Star City Plus लोकप्रिय बाइकपैकी असून, यामध्ये १०९.७ सीसी क्षमतेचे इंजिन आहे. ही बाइक १ लीटर पेट्रोलमध्ये ८५ किमीपर्यंत मायलेज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला असून, याची किंमत ६८ हजार ४६५ रुपये एक्स-शोरुम आहे.
8 / 10
TVS Radeon ही लेटेस्ट बाइक असून, यामध्येही सिंगल सिलेंडर १०९.७ सीसी क्षमतेचे इंजिन आहे. एका लीटर पेट्रोलमध्ये ही बाइक ६९.३ किमी मायलेज देते, असा दावा कंपनीचा आहे. या बाइकची एक्स-शोरुम किंमत ६१ हजार २४२ रुपये आहे.
9 / 10
तसेच TVS कडून ज्युपिटरवर विशेष ऑफर दिली जात आहे. या माध्यामातून तुम्ही कमी खर्चात ही स्कूटर आपल्या घरी नेऊ शकता. सोशल मीडियावर देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ही स्कूटर किमान डाऊन पेमेंट आणि कमी ईएमआयवर उपलब्ध आहे.
10 / 10
जर तुम्हाला ही स्कूटर विकत घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला १०,९९९ रूपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. याशिवाय तुम्हाला प्रत्येक महिन्याला २,२२२ रूपयांचा ईएमआयदेखील द्यावा लागेल.
टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन