शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TVS Raider 125: लाँच झाली स्वस्त स्पोर्टी डिझाईन असलेली बाईक; पाहा किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 6:23 PM

1 / 8
देशातील प्रमुख दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनीने गुरूवारी देशांतर्गत बाजारात 125cc सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीने आपली नवीन स्पोर्टी डिझाइन केलेली कम्युटर बाईक TVS Raider भारतीय बाजारात लाँच केली.
2 / 8
125 cc सेगमेंटमध्ये, नवीन Raider प्रामुख्याने हिरो ग्लॅमरसारख्या मॉडेलशी स्पर्धा करेल. कंपनीने या बाईकमध्ये 124.8cc च्या सिंगल सिलिंडर क्षमतेचे थ्री-व्हॉल्व्ह इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 11.22 hp ची पॉवर आणि 11.2 Nm ची टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते. तसंच कंपनीचा दावा आहे की ही बाईक 0 ते 60 किलोमीटरचा स्पीड केवळ 5.9 सेकंदात पकडण्यास सक्षम आहे.
3 / 8
स्टाईलबद्दल सांगायचं झाल्यास नवीन TVS Raider कंपनीच्या मागील मॉडेल अपाचे 160 4 व्ही आणि 200 4 व्ही नं प्रभावित असल्याचे दिसून येते. या बाईकसोबत स्लीक फ्रंट काउलमध्ये एलईडी हेडलॅम्प क्लस्टर आणि सी-आकाराचे एलईडी डे टाईम रनिंग लाइट्स देण्यात आले आहेत. तर नवीन 5-इंचाच्या टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अंतर्गत टर्न सिग्नल बाहेर दिसतात जे गियर पोझिशन इंडिकेटर, रेंज इत्यादी माहिती दर्शवतात.
4 / 8
कनेक्टिव्हीटी आणि टेक्नॉलॉजी सध्या अतिशय महत्त्वाची आहे. याचा वापरही अनेक कंपन्या करताना दिसत आहे. टीव्हीएसनं या बाईकमध्ये ब्ल्युटूथ कनेक्टिव्हीटीही दिली आहे.
5 / 8
याशिवाय रेडरमध्ये कंपनीनं स्प्लिट सीट सेटअप आणि सिंग पीस ग्रॅब रेल अलॉय फुटपेग आणि रबर ब्रेक पेडलसोबत अॅल्युमिनिअम फिनिशिंग दिलं आहे. अन्य हायलाईट्सबद्दल सांगायचं झाल्यास शार्प लुकिंग साईड बॉडी पॅनल, रेडर 3D लोगो आणि टीव्हीएसच्या सिग्नेचर प्रेसिंग होर्स 3D लोगो फ्युअल टँकवर देण्यात आला आहे.
6 / 8
याशिवाय बाईकमध्ये मस्क्युलर फ्युअल टँकसोबत अपराईट हँडलबार आणि न्युट्रल फुटपेग पोझिशनिंग देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे 240 मिमीचे डिस्क आणि रिअर 130 मिमी ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत.
7 / 8
सस्पेन्शनसाठी यामध्ये टेलिस्कोपिक फ्रन्ट फोर्क्स आणि मोनोशॉक रिअर शॉक अब्झॉर्बरचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये 10 लीटरचा फ्युअल टँक देण्यात आला आहे.
8 / 8
एन्ट्री लेव्हल बाईकर्ससाठी ही उत्तम बाईक आहे. आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन पॉवर असलेल्या या बाईकची किंमत 77,500 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.
टॅग्स :bikeबाईकIndiaभारतhero moto corporationहिरो मोटो कॉर्पdigitalडिजिटल