शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

6 जुलै रोजी लॉन्च होणार TVSची पहिली क्रूझर बाइक; फीचर आणि किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 6:21 PM

1 / 7
TVS Upcoming Bike: भारतात टीव्हीएस मोटर (TVS)कडे खिशाला परवडणाऱ्या मोटारसायकलपासून स्पोर्ट्स बाइक्सपर्यंत, अनेक गाड्या आहेत. पण, कंपनीने आतापर्यंत क्रूझर बाइक लॉन्च केलेली नाही.
2 / 7
पण, आता कंपनी देशात आपली पहिली क्रूझर बाइक लॉन्च करणार आहे. येत्या 6 जुलै रोजी टीव्हीएसची पहिली क्रूझर बाइक लॉन्च होणार आहे. परंतू, कंपनीकडून या गाडीचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
3 / 7
काही रिपोर्ट्सनुसार, कंपनी झेपेलिन क्रूझर (Zeppelin cruiser) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाडीच्या लॉन्चिंगची शक्या यासाठी व्यक्त करम्यात येत आहे, कारण Zeppelin R क्रूझर कॉन्सेप्टला ऑटो एक्सपो 2018 मध्ये दाखवण्यात आले होते.
4 / 7
इतकेच नाही, तर कंपनीने या वर्षी सुरुवातीला ‘Zeppelin R’ नावाचा पेटेंटदेखील केला होता. त्यामुळेच कंपनी देशात ही गाडी लॉन्च करेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
5 / 7
Zeppelin R कॉन्सेप्टमध्ये लो-स्लंग क्रूझर फॉर्म फॅक्टर दिसले होते. यात सिंगल-पीस स्टेप्ड सीटदेखील दिसली होती. परंतू, यात स्पोर्टी लूकसाठी स्पोर्टियर फ्लॅट हँडलबार दिला होता.
6 / 7
याशिवाय, यात इंटीग्रेटेड एलईडी डीआरएल आणि हेक्सागोनल हेड लाइट असेंबली पाहण्यात आली आहे. परंतू, जे कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये दिसले, तशीच गाडी मिळेल, अशी शक्यता फार कमी आहे. लॉन्चिंगदरम्यान, यात अनेक बदल केले जाऊ शकतात.
7 / 7
या गाडीची किंमत आणि इतर फीचर्सबद्दल अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. लॉन्चिंगनंतरच टीव्हीएसच्या क्रूझर बाइकबद्दल कळू शकेल.
टॅग्स :Automobileवाहनauto expoऑटो एक्स्पो 2020bikeबाईक