शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TVS ची जबरदस्त ऑफर; केवळ १०,९९९ डाऊन पेमेंटवर घरी घेऊन जा Jupiter स्कूटर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 4:25 PM

1 / 10
स्कूटर्स कायमच अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सेगमेंटमध्ये होंडा अॅक्टिवा ही पहिल्या क्रमांकावर आहे. तर TVS या कपनीची ज्युपिटर ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे.
2 / 10
जर तुम्हाला एखादी स्कूटर खरेदी करायची असेल तर ज्युपिटर हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. यावेळी कंपनी या स्कूटरवर खास फायनॅन्स ऑफर करत आहे. या माध्यामातून तुम्ही कमी खर्चात ही स्कूटर आपल्या घरी नेऊ शकता.
3 / 10
सोशल मीडियावर देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ही स्कूटर किमान डाऊन पेमेंट आणि कमी ईएमआयवर उपलब्ध आहे.
4 / 10
जर तुम्हाला ही स्कूटर विकत घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला 10,999 रूपयांचं डाऊन पेमेंट करावं लागेल. याशिवाय तुम्हाला प्रत्येक महिन्याला २,२२२ रूपयांचा ईएमआयदेखील द्यावा लागेल.
5 / 10
TVS Jupiter ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. नुकतीच कंपनीनं ही स्कूटर अपडेटेड इंजिनसोबत बाजारात लाँच केली होती.
6 / 10
सध्या ही स्कूटर देशात पाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये शीट मेटल व्हाईट, स्टँडर्ड, ZX, ZX डिस्क आणि क्लासिक यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं या स्कूटरचं बेस व्हेरिअंट लाँच केलं होतं.
7 / 10
या स्कूटरची सुरुवातीची किंमत ६४,४३७ रूपये आहे. तर या स्कूटरच्या टॉप व्हेरिअंटची किंमत ७३,७३७ रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
8 / 10
TVS Jupiter मध्ये कंपनीनं १०९.७ सीसी क्षमतेचं सिंगल सिलिंडर असलेल्या BS6 या इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन ७.४७पीएस ची पॉवर आणि ८.४ एनएमचा टॉर्क जनरेच करतं.
9 / 10
यामध्ये पॉवर आऊटपूट हे BS4 च्या तुलनेत 0.51पीएसपर्यंत कमी झालं आहे. परंतु यापूर्वीच्या तुलनेत स्कूटर १५ टक्के अधिक मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
10 / 10
ज्युपिटरच्या नव्या ZX या व्हेरिअंटमध्ये कंपनीनं इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. हे एकप्रकारचं सायलेंट फीचर देतं. जेव्हा तुम्ही स्कूटर स्टार्ट करता तेव्हा विना आवाज करताच ही स्कूटर सुरू होऊ शकते.
टॅग्स :scooterस्कूटर, मोपेडMONEYपैसाIndiaभारतbikeबाईकHondaहोंडा