शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ultraviolette F77: पळव पळव पळव..! तब्बल 307KMची रेंज; पुढच्या महिन्यात लॉन्च होणार 'ही' स्वदेशी बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 2:39 PM

1 / 7
Ultraviolette F77 Booking and Features: बंगळुरूस्थित ऑटोमोबाईल कंपनी Ultraviolette लवकरच आपली F77 इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतात लॉन्च करणार आहे. या नवीन मोटरसायकलचे बुकिंग याच महिन्यात सुरू होणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने बाईकच्या रेंजचा खुलासा केला आहे.
2 / 7
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही F77 इलेक्ट्रिक मोटरसायकल सिंगल चार्जवर तब्बल 307 किमीची रेंज देईल. F77 साठी 23 ऑक्टोबर 2022 पासून प्री-बुकिंग सुरू होईल. ग्राहकांना फक्त 10 हजार रुपयांमध्ये ही गाडी बुक करता येईल.
3 / 7
येत्या 24 नोव्हेंबरला बाईकचे लॉन्चिंग होणार आहे. कंपनी बाईकला टप्प्याटप्प्याने लाँच करणार आहे. बाईक आधी बंगळुरू आणि नंतर इतर शहरांमध्ये लॉन्च केली जाईल. गेल्या 5 वर्षांपासून या बाईकवर काम सुरू होते.
4 / 7
या बाईकमध्ये उत्तम टॉप स्पीड आणि चांगली रेंज मिळणार आहे. कंपनीने वेगवेगळ्या रस्त्यांवर या गाडीची चाचणी केली आहे. या बाईकसाठी कंपनीला 190 देशांमधून 70 हजाराहून अधिक प्री-लाँच बुकिंग मिळाल्या आहेत.
5 / 7
अल्ट्राव्हायोलेट F77 एअरस्ट्राइक, शॅडो आणि लेझर या तीन प्रकारांमध्ये लॉन्च होईल. कंपनीचे म्हणणे आहे की, प्रत्येक व्हर्जनची स्वतःची वेगळी ओळख असेल.
6 / 7
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, अल्ट्राव्हायोलेट F77 ड्युअल-चॅनल ABS, अॅडजस्टेबल सस्पेंशन, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारख्या वैशिष्ट्यांसह येईल.
7 / 7
यात टीएफटी स्क्रीनही असेल, जी रायडरला विविध माहिती दाखवेल. बाइकसोबत विविध अॅक्सेसरीजही देण्यात येणार आहेत. यात पोर्टेबल फास्ट चार्जर, स्टँडर्ड चार्जर, व्हील कॅप, होम चार्जिंग पॉड, क्रॅश गार्ड, पॅनियर्स आणि व्हिझर असेल.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनbikeबाईक