शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आकर्षक लुक अन् 300 km रेंज; चंद्रयान-3 च्या सन्मानार्थ लॉन्च झाली पॉवरफुल इलेक्ट्रिक बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 1:39 PM

1 / 6
Chandrayan 3: भारताचे चंद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, त्यामुळे हा दिवस भारतीसांठी खूप खास आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरुन नवा इतिहास घडवेल. इस्रोच्या शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची मेहनत वाया जाऊ नये, म्हणून प्रत्येक भारतीय चंद्रयान-3 यशस्वी होण्यासाटी प्रार्थना करत आहे. दरम्यान, या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मानार्थ इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्ट-अप अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हने आपल्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक बाइक F77 चे नवीन स्पेस एडिशन लॉन्च केले आहे. ही बाईक एरोस्पेस ग्रेड मटेरियलपासून बनवली गेली आहे.
2 / 6
F77 स्पेस एडिशनमध्ये काय खास आहे: कंपनीने या नवीन बाईकला स्पेस एडिशन, असे नाव दिले आहे. ही बाईक चंद्रयान-3 च्या सन्मानार्थ तयार केली आहे. चंद्रयान-3 मोहीम यशस्वी होईल की नाही, याने काही फरक पडत नाही, परंतु देशातील शास्त्रज्ञ आणि विशेषत: इस्रो आणि या मोहिमेशी संबंधित सर्व लोकांच्या अथक परिश्रमाच्या सन्मानार्थ या इलेक्ट्रिक बाईकचे नवीन व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, या नवीन व्हेरिएंटचे फक्त 10 युनिट्स तयार केले असून, याची किंमत 5.60 लाख रुपये (एक्स-शोरुम) निश्चित करण्यात आली आहे. या बाईकची बुकिंग आजपासून, म्हणजेच 22 ऑगस्टपासून सुरू झाली आहे.
3 / 6
अल्ट्राव्हायोलेट F77 स्पेस एडिशन- या बाइकला आणखी आकर्षक बनवण्यासाठी कंपनीने बाईकच्या लूक आणि डिझाइनमध्ये कॉस्मेटिक बदल केले आहेत. नवीन ग्राफिक्स आणि पेंट स्कीमसह येणारी ही बाईक मुख्यत्वे 'F77 स्पेशल' मॉडेलसारखीच आहे. कंपनीने लिमिटेड एडिशन मॉडेल म्हणून फक्त 77 युनिट्स बनवले होते.
4 / 6
पॉवर आणि परफॉर्मन्स: F77 स्पेस एडिशनमध्ये 40.5 bhp पॉवर आणि 100 Nm पीक टॉर्क जनरेट करणारी मोटर दिली आहे. यामध्ये कंपनीने 10.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो एका चार्जमध्ये तब्बल 307 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो. बाईखचा टॉप स्पीड 152 किमी/तास आहे आणि ही बाईक फक्त 2.9 सेकंदात 60 किमी/ताशी वेगाने धावण्यास सक्षम आहे. अशीच पॉवर आणि परफॉर्मन्स F77 स्पेशल एडिशनचादेखील आहे.
5 / 6
बाइकमधील तंत्रज्ञान: एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियम: कंपनीचा दावा आहे की, अल्ट्राव्हायोलेट F77 स्पेस एडिशनमध्ये एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. अॅल्युमिनियम 7075 - एक उच्च घनता असलेला पदार्थ आहे, जो खूप हलका असूनही स्टील्स सारखीच ताकद देतो. या विशेष गुणवत्तेमुळे हा पदार्थ विमानांमध्ये वापरला जातो.
6 / 6
एरोस्पेस ग्रेड पेंट : बाइकला चांगला लूक देण्यासाठी या बाइकमध्ये नियमित पेंटऐवजी एरोस्पेस ग्रेड पेंटचा वापर करण्यात आला आहे. ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे की, हा कायमस्वरुपी आणि सुरक्षित आहे. याच्या स्मूथ फिनिशींगमुळे आव्हानात्मक परिस्थितीतही बाईकचा रंग उतरत नाही. आणि हा उच्च दर्जाचा पेंट पूर्णपणे गंजरोधक आहे.
टॅग्स :Automobileवाहनbikeबाईकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरChandrayaan-3चांद्रयान-3