upcoming cars in august 2023 launch tata punch cng hyundai creta toyota audi q8 e tron
ह्युंदाईपासून टाटापर्यंत... ऑगस्टमध्ये अनेक कारचे होणार लाँचिंग! By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 5:33 PM1 / 8नवी दिल्ली : भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर सध्या तेजीत आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी आगामी ऑगस्ट महिना खूप महत्त्वाचा असणार आहे. पुढील महिन्यात अनेक नवीन मॉडेल्स लाँच होऊ शकतात. येत्या काही दिवसांत तुम्हाला लक्झरीसह विविध सेगमेंटमध्ये नवीन कार पाहायला मिळतील. फ्यूल बेस्ड कार व्यतिरिक्त, यामध्ये CNG, SUV आणि EV कारचा समावेश असणार आहे. 2 / 8दरम्यान, सणासुदीच्या हंगामाची ही सुरुवात असून ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंझपासून ह्युंदाई आणि व्होल्वोपर्यंतच्या कंपन्या नवीन कार सादर करू शकतात. दरम्यान, ऑगस्ट 2023 मध्ये लाँच होणाऱ्या सर्व कारबाबत जाणून घ्या...3 / 8टाटा पंचच्या सीएनजी व्हर्जनची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. टाटा पंच सीएनजी लाँच झाल्यास ही कंपनीची पाचवी सीएनजी कार असणार आहे. यामध्ये 1.2 लीटर बाय-फ्यूल पेट्रोल इंजिनची पॉवर मिळू शकते.4 / 8मर्सिडीज बेंझ जीएलसीचे सेकेंड जनरेशन मॉडेल 9 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. कारची प्री-बुकिंग आधीच 1.5 लाख रुपयांना सुरू आहे. आलिशान कार 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.0 डिझेल इंजिन ऑप्शनसह सादर केली जाऊ शकते.5 / 8टोयोटा किर्लोस्कर मोटर या वर्षी ऑगस्टमध्ये रुमिओन लाँच करू शकते. आगामी MPV ही मारुती सुझुकी अर्टिगाची टोयोटा व्हर्जन असणार आहे. यात 1.5 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ही कार सीएनजी ऑप्शनसहही लाँच केली जाऊ शकते.6 / 8नवीन ऑडी Q8 ई-ट्रॉन एसयूव्ही आणि Q8 ई-ट्रॉन स्पोर्टबॅकची किंमत 18 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. ऑडी Q8 ई-ट्रॉन रेंजला 50 आणि 55 ट्रिम लेव्हलमध्ये ऑफर केली जाईल. ऑडीचा दावा आहे की, एकदा फूल चार्ज झाल्यावर ही कार 600 किमी अंतर कापेल.7 / 8ह्युदांई क्रेटा आणि अल्काजारच्या अॅडव्हेंचर एडिशन सुद्धा लाँच केल्या जाऊ शकतात. ही पॉप्युलर मिड-साइज एसयूव्हीची लिमिटेड एडिशन असणार आहे. आगामी मॉडेल्स 'रेंजर खाकी' रंगात सादर केली जाईल. इंटिरियर ब्लॅक राहील तर इंजिनमध्ये काही बदलाव राहणार नाही.8 / 8ऑगस्टमध्ये लाँच होणार्या संभाव्य कारमध्ये Volvo C40 रिचार्जचेही नाव आहे. आगामी इलेक्ट्रिक कारची किंमत पुढील महिन्यात जाहीर केली जाऊ शकते. ही कंपनीची भारतातील दुसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे. Volvo C40 रिचार्ज सिंगल चार्जवर 530 किमी रेंज देऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications