शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Upcoming Electric Bikes in 2022: पुढचे वर्ष इलेक्ट्रीक बाईक्सचे! जानेवारीपासून एकापेक्षा एक धांसू मोटरसायकल लाँच होणार; 250 किमी रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 4:14 PM

1 / 8
2021 हे वर्ष इलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेत एक क्रांती आणणारे ठरले आहे. याच वर्षात पेट्रोल, डिझेलने कहर केला आणि इलेक्ट्रीक वाहनांना सुगीचे दिवस आले आहेत. याच वर्षात एवढी इलेक्ट्रीक वाहने लाँच झाली तेवढी कधी पेट्रोल, डिझेलचीही झाली नसतील. यामध्ये स्कूटरचा वाटा मोठा आहे. देशात सध्या एक इलेक्ट्रीक बाईक आहे. आता येत्या जानेवारीत आणखी एक बाईक भारतात लाँच होणार आहे.
2 / 8
सरत्या वर्षाला निरोप देवून आता काही कंपन्या आणखी इलेक्ट्रीक वाहने लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये बाईक्सदेखील असणार आहेत.
3 / 8
हिरो इलेक्ट्रीक बाईक लाँच करणार आहे. या बाईकचे नाव Hero Electric AE-47 असे आहे. ही हिरोची पहिली इलेक्ट्रीक बाईक असणार आहे. या बाईकमध्ये लाईट पोर्टेबल लिथिअम आयन 48V/3.5 kWh बॅटरी देण्यात आलीआहे. या बाईकला 4000 वॉटची पॉवर देण्यात आली आहे. या बाईकचा वेग 85 किमी प्रति तासाहून अधिक असेल.
4 / 8
या बाईकमध्ये 2 मोड देण्यात आले आहे. पावर मोडमध्ये सिंगल चार्जवर 85 किमीची रेंज आणि इको मोडवर 160 किमीच्या रेंजचा दावा करण्यात आला आहे.
5 / 8
कोमाकी रेंजर इलेक्ट्रीक मोटरसायकल जानेवारी 2022 मध्य लाँच होण्याची शक्यता आहे. या रेंजर बाईकमध्ये 5,000 वॉटची ताकद देण्य़ात आली आहे. ही बाईक ऑफरोडही चालविता येणार आहे. यामध्ये 4 किलोवॉट बॅटरी पॅक देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार देशातील सर्वाधिक बॅटरी पॅक असलेली ही बाईक असेल.
6 / 8
या बाईकची रेंजही भन्नाट असणार आहे. कोमाकी रेंजरची रेंज सिंगल चार्जवर 250 किमी असेल.
7 / 8
Okinawa Oki100 ही इलेक्ट्रीक मोटरसायकल 2022 च्या पहिल्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये रिमुव्हेबल बॅटरीसह फास्ट चार्जर मिळतो. याचा टॉप स्पीड 100 ते 120 किमी प्रति तास असेल. सिंगल चार्जवर ही बाईक 200 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे.
8 / 8
Emflux One एक इलेक्ट्रीक स्पोर्ट बाईक आहे. ही बाईक 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे ही बाईक लाँच करण्यास उशीर झाला. आता ही बाईक 2022 मध्ये लाँच होईल. याचा टॉप स्पीड 200 किमीप्रति तास असू शकतो. तसेच या बाईकची रेंज 200 किमी असू शकते.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन