upto rs 65000 discount on tata cars here are the details
टाटाच्या Cars वर मिळतेय 65,000 रुपयांपर्यंत सवलत By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 10:43 AM1 / 6नवी दिल्ली : बाजारातील सेलवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी टाटा मोटर्सने (टाटा मोटर्स) आपल्या ग्राहकांसाठी फायदे आणि सवलतीच्या ऑफर्स आणल्या आहेत. 2 / 6सध्या तुम्ही टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा हॅरियर आणि टाटा सफारी डीलरशिपमधून विकत घेतल्यास तुम्हाला बचत करण्याची चांगली संधी मिळेल. रोख सवलत, कॉर्पोरेट सवलत आणि एक्सचेंज बोनस म्हणून तुम्हाला फायदे मिळतील.3 / 6टाटा टियागोवर ३८,००० रुपयांचा फायदा होणार आहे. यात २०,००० रुपयांच्या रोख सवलतीचा समावेश आहे. तसेच उर्वरित बचत आपल्या कॉर्पोरेट सवलत आणि एक्सचेंज बोनसअंतर्गत असणार आहे.4 / 6तुम्ही ही कार ५.६४ च्या सुरुवातीच्या किंमतीसह खरेदी करू शकाल. तुम्ही कारवर ४३,००० रुपये वाचवू शकता. यात २०,००० रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. या कारमध्ये १. २ लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे.5 / 6टाटा हॅरियर १४.३९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह खरेदी केला जाऊ शकते. सध्या ६५ हजार रुपयांच्या सवलतीसह तुम्ही ही कार खरेदी करू शकता. यात ४०,००० रुपयांच्या रोख सवलतीचा समावेश आहे.6 / 6ही कार १४. ९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह खरेदी करता येईल. या कारवर २५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी ही कार बाजारात आणली आहे. भारतात या कारला जास्त मागणी असल्याचे दिसून येते. आणखी वाचा Subscribe to Notifications