validity of driving license, RC book Expired? Renew Otherwise pay a fine of Rs 5,000
ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुकची व्हॅलिडीटी पाहिली का? असे रिन्यू करा नाहीतर ५००० चा दंड भरा By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 4:12 PM1 / 11जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन किंवा वाहनाच्या आरसी बुकची वैधता संपली किंवा संपत आली असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नवीन वर्षापासून तब्बल ५००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने रिन्यू करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची सूट दिली होती. 2 / 11ज्या लोकांचे लायसन किंवा आरसी बुकची वैधता, फिटनेस प्रमाणपत्र मार्च २०२० नंतर संपत असेल त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश होते. आता ही मुदत संपत आली आहे. 3 / 11यामुळे वाहनचालकांना त्यांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नुतनीकरण करावे लागणार आहे. परिवाहन विभागाद्वारे दिली गेलेली सूट ३१ डिसेंबरला संपत आहे. 4 / 11आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जर केंद्रीय रस्ते परिवाहन आणि राजमार्ग मंत्रालयाने ही सूट दिलेली मुदत वाढविली नाही तर वाहन चालकांच्या अडचणी वाढणार आहेत. 5 / 11नवीन मोटर वाहन नियमांनुसार जर वाहनचालकाकडे लायसन किंवा वाहन परवाना नसेल आणि जर त्याला वाहन चालविताना पकडले तर ५००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 6 / 11ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करण्यासाठी परिवाहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. parivahan.gov.in वर 'ड्रायव्हिंग लायसन-संबंधित सेवा' वर क्लिक करावे लागणार आहे. 7 / 11यानंतर अर्जदाराला 'डीएल सेवा' वर क्लिक करावे लागेल. यामध्ये लायसन नंबरसह अन्य माहिती भरावी लागणार आहे. यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. 8 / 11जवळच्या आरटीओ कार्यालयात अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. 9 / 11आरटीओमध्ये गेल्यावर बायोमेट्रिकद्वारे कागदपत्रे तपासली जाणार आहेत. यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन दिले जाणार आहे. 10 / 11हीच प्रक्रिया वाहनाच्या आरसी नुतनीकरणाची देखील आहे. मात्र, यासाठी तुम्हाला पीयुसी, इन्शुरन्स आदी कागदपत्रे लागणार आहेत. 11 / 11या दोन्ही प्रक्रियेसाठी या महिन्यात मोठी गर्दी झाली आहे, यामुळे वेटिंग पिरिएडही वाढला आहे. असे झाल्यास तुम्ही वाहन चालविणे बेकायदेशीर आणि धोक्याचे ठरणार आहे. अपघात झाल्यास वाहनाच्या आरसीसह लायसनही नसल्याने मनुष्यवधासारखे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications