शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

530 किमीची रेंज अन् दमदार मोटर; Volvo ने लॉन्च केली Electric SUV, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 4:41 PM

1 / 6
Volvo C40 Recharge Price & Features: इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याने भारतात एका पाठोपाठ एक इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत. यातच आता प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी व्होल्वोने (Volvo) भारतात आपली ऑल-इलेक्ट्रिक व्होल्वो C40 रिचार्ज लॉन्च केली असून याची विक्रीही सुरू झाली आहे.
2 / 6
Volvo C40 रिचार्जमध्ये 78kWh चा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे, जो 530 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. कारची पॉवरट्रेन 402bhp आणि 660Nm आउटपुट देते. व्होल्वोचे म्हणणे आहे की, C40 रिचार्ज 4.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि ताशी 180 किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे.
3 / 6
कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Volvo C40 रिचार्जमध्ये लेदर-फ्री इंटीरियर, पॅनोरॅमिक सनरुफ, 13-पीकर हरमन कार्डन सिस्टम, गुगल व्हॉईस असिस्टन्स, वायरलेस चार्जिंग, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि एअर प्युरिफायर सिस्टमसह सुरक्षेसाठी 7 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS आहेत.
4 / 6
कारच्या ADAS मध्ये क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट इन्फॉर्मेशन सिस्टम, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, पायलट असिस्ट, लेन किपिंग असिस्ट, कोलिजन मिटिगेशन सपोर्ट आणि पार्किंग असिस्ट सेन्सर्स (समोर, बाजू आणि मागील) यासारखे फीचर्स मिळतात.
5 / 6
कारच्या ADAS मध्ये क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट इन्फॉर्मेशन सिस्टम, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, पायलट असिस्ट, लेन किपिंग असिस्ट, कोलिजन मिटिगेशन सपोर्ट आणि पार्किंग असिस्ट सेन्सर्स (समोर, बाजू आणि मागील) यासारखे फीचर्स मिळतात.
6 / 6
स्पॉयलर आणि टायर मिळून 12% अधिक रेंज मिळते. त्यामुळे बॅटरी आणि मोटरचे काम अधिक सोपे होते. कारची एक्स-शोरूम किंमत 61.25 लाख रुपये आहे. नवीन Volvo C40 रिचार्जसाठी बुकिंग सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइटवरूनच बुकिंग ऑनलाइन करता येईल.
टॅग्स :Volvoव्होल्व्होElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनcarकार