want to buy electric car delhi switch campaign discount of lakh rupees avail this way
इलेक्ट्रीक कार खरेदी केल्यास मिळतेय ३ लाखांची सूट; पाहा कसा घेऊ शकता हा लाभ By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 2:41 PM1 / 10मोठ्या शहरांमध्ये प्रदुषणाचा धोका अधिक आहे. दरम्यान, या धोका टाळण्यासाठी सरकारकडून काही उपाययोजना लागू करण्यात येत असतात. 2 / 10काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इलेक्ट्रीक कार्सना चालना देण्यासाठी मोठी घोषणा केली होती. 3 / 10यासाठी दिल्ली सरकानं इलेक्ट्रीक वाहनांसाठी दिल्ली स्वीच ही मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत सरकारन इलेक्ट्रीक वाहनांवर मोठी सूट देत आहे. 4 / 10दिल्ली सरकारनं इलेक्ट्रीक वाहनांवर १.५ लाख रूपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रीक वाहनांवरील रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशनदेखील मोफत करण्यात आलं आहे. 5 / 10या घोषणेमुळे दिल्लीतील पेट्रोलवर चालणारी वाहनं कमी होऊन प्रदुषणदेखील कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 / 10२०२४ पर्यंत दिल्लीत नव्यानं विक्री होणाऱ्या वाहनांपैकी २५ टक्के इलेक्ट्रीक वाहनं असू शकतात असा अंदाज केजरीवाल सरकारनं व्यक्त केला आहे. 7 / 10याअंतर्गत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी ३० हजार रूपयांचं अनुदान देणअयाचा निर्णय केजरीवाल सरकारनं घेतला आहे. तर इलेक्ट्रीक कार्समध्ये १.५ लाख रूपयांचं अनुदान देण्यात येईल.8 / 10याशिवार या वाहनांवर कोणत्याही प्रकारे रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन चार्ज आकारला जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 9 / 10XM ट्रिमवर रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशनवर १ लाख ४० हजार ५०० रूपयांची सूट देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त XZ+ व्हेरिअंट्सवर १ लाख ४९ हजार ९०० रूपयांची सूट मिळेल. 10 / 10दिल्ली सरकार आता Tata Nexon EV च्या खरेदीवर ३ लाख रूपयांपेक्षा अधिक सूट देत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications