Want a luxury car for less than Rs 3 lakh These are the best options scoda hyundai audi much more
तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत हवीये लक्झरी कार?; 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 6:53 PM1 / 12भारतात सेकंड हँक कार्सच्या मार्केटची सातत्यानं ग्रोथ होताना दिसत आहे. नव्या कार्सप्रमाणे जुन्या गाड्यांचीही मागणी मोठी आहे. सेकंड हँड कार खरेदी करण्याचा एक फायदा म्हणजे कोणत्याही ब्रँडचं मॉडेल तुम्ही कमी किंमतीला खरेदी करू शकता.2 / 12अनेकांना लक्झरी गाड्यांचीही आवड असते. परंतु महागड्या गाड्या खरेदी करणं सर्वांनाच शक्य होतं असं नाही. आज आपण तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या पॉप्युलर लक्झरी गाड्यांबाबत माहिती घेणार आहोत. 3 / 12Hyundai Sonata ही एका वेळची सर्वात उत्तम कार मानली जात होती. यामध्ये असे काही फीचर्स देण्यात आले होते ज्याची कल्पनाही त्यावेळी करणं शक्य नव्हतं.4 / 12२००५ सालची Hyundai Sonata तुम्हाला ३ लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकते. या गाडीमध्ये १९९७ सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. ते १३४ बीएचपी आणि १६३ एनएमचा टॉर्क जनरेट करतं. या गाडीकडून मात्र चांगल्या मायलेजची अपेक्षा ठेवता येणार नाही. 5 / 12Skoda Superb ही लक्झरी सेडान कार आहे. यामध्ये कार आरामदायी प्रवासासाठीही उत्तम आहे. २०१० सालचं मॉडेल तुम्हाला कमी किंमतीत मिळण्याची शक्यता आहे. 6 / 12यामध्ये तुम्ही १.८ टीएसआय किंवा २.८ व्ही ६ पेट्रोल इंजिनमधील कोणताही ऑप्शन घेऊ शकता. ही कार ऑटो गिअरबॉक्ससह येते. तसंच यात १६ इंचाचे व्हिल्सही देण्यात येतात.7 / 12Honda Accord या कारला सेकंड हँड बाजारात आजही मागणी आहे. ही कारही स्पेशियस, मोठी आरामदायक आहे. या कारमध्येही तुम्हाला लक्झरी कारचा फील येईल.8 / 12या कारमध्ये तुम्ही सीएनजीदेखील लावू शकता. यामुळे तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचीही चिंता करावी लागणार नाही. तुम्ही या कारचं २००९ सालचं मॉडेल ३ लाखांपेक्षा कमी किंमतीत घेऊ शकता. 9 / 12 कारचे स्पेअर पार्ट्स अतिशय महागडे आहेत आणि या कारचं मायलेज कमी आहे. परंतु लक्झरी कार म्हणून ही कार चांगली आहे. ही कार ऑटो गिअरबॉक्ससह येते आणि ३ लाखांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला २००७ चं मॉडेल मिळू शकेल. 10 / 12Toyota Camry हा तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणारा एक उत्तम ऑप्शन असू शकतो. परंतु ही कार स्वस्तात मिळाली याचा अर्थ याची मेन्टेनन्स कॉस्ट कमी असेल असं होत नाही. 11 / 12Audi A4 या कारचं २००६ चं मॉडेल तीन लाखांच्या रेंजमध्ये मिळू शकतं. कारमध्ये पेट्रोल इंजिन आणि ऑटो गिअरबॉक्स देण्यात आला आहे.12 / 12यामध्ये मिळणारं १७९८ सीसीचं इंजिन १७० बीएचपीची पॉवर आणि ३२० एनएमचा टॉर्क जनरेट करतं. दरम्यान, सेकंड हँड कार घेताना त्यांचं रजिस्ट्रेशन आता वैध आहे किंवा नाही हे तापसून पाहणं आवश्यक आहे. त्यासोबतच सर्व पार्ट्सची पडताळणीही करणं आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications