Want to buy a cool 'sporty' car at a cheap price? Here are five options…
स्वस्तात मस्त ‘स्पोर्टी’ कार घ्यायचीय? हे आहेत पाच पर्याय... By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 12:04 PM1 / 6तुम्हाला कमी किमतीत पण स्पोर्टी लूक असलेली कार खरेदी करायची असेल तर हे आहेत सर्वांत स्वस्त पर्याय...2 / 6ह्युंदाई ग्रँड आय १० निऑस टर्बो ही स्पोर्टी हॅचबॅक कार कमी किमतीत एक चांगला पर्याय आहे. याची एक्स-शोरूम किंमत - ८.०२ लाखांपासून सुरू होते.3 / 6महिंद्राने गेल्या महिन्यातच आपली लोकप्रिय एक्सयूव्ही ३०० ही सब ४ मीटर एसयूव्ही स्पोर्टी आवृत्तीमध्ये आणली आहे. ही एसयूव्ही १० सेकंदात शून्य ते १०० किमीचा वेग पकडते, असा कंपनीचा दावा आहे. एक्स-शोरूम किंमत १०.३५ लाख रुपयांपासून.4 / 6बजेटमध्ये स्पोर्टी कार खरेदी करणाऱ्यांसाठी टाटा मोटर्सची अल्ट्रोझ आयटर्बो हीदेखील उत्तम पर्याय आहे. आयटर्बो आवृत्तीची किंमत ८.२५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. 5 / 6आय २० एन लाइनला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर ह्युंदाईने अलीकडेच कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यूदेखील एन लाइन आवृत्तीमध्ये आणली आहे. ही जास्त स्पोर्टी लूक आणि लेटेस्ट फीचर्ससह आली असून, एक्स-शोरूम किंमत १२.१६ लाख रुपयांपासून सुरू होते.6 / 6ह्युंदाई कंपनीने या प्रीमियम हॅचबॅक कारची स्पोर्टियर एन लाइन आवृत्तीही आकर्षक एक्सटिरियर्स आणि इंटिरियर्स व शानदार फीचर्ससह आणली आहे. आय २० एन लाइनची एक्स-शोरूम किंमत १० लाख रुपयांपासून सुरू होते. आणखी वाचा Subscribe to Notifications