Want to buy a 'safe' car?; See 10 important safety features...!
तुम्हाला 'सेफ' कार घ्यायचीय?; बघा १० महत्वाचे सेफ्टी फीचर्स...! By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 4:30 PM1 / 10साधारणपणे महागड्या कारमध्ये जवळपास सर्व सुरक्षा फीचर्स मिळतात. सेफ्टीसाठी सरकारने अनेक नवे नियम आणले असले, तरी एंट्री लेव्हल कारमध्ये अजूनही अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांशी तडजोड केली जाते. तुम्हीही नवीन कार घेणार असाल, तर काही महत्वाचे सेफ्टी फीर्चस असणे आवश्यक आहे.2 / 10अपघातसमयी एअरबॅग्ज सर्वात महत्वाच्या ठरतात. किमान पुढील प्रवासी आणि चालकासाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग असणे आवश्यक आहे. 3 / 10यामुळे अचानक ब्रेक लागताना किंवा अपघातात प्रवाशांची सीटवर पोझीशन कायम राहते. 4 / 10अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रोनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन हे महत्वाचे ब्रेकिंग वैशिष्ट्ये अचानक ब्रेक लावताना दोन्ही महत्वाची भूमिका बजावतात. 5 / 10कमी जागेत पार्किंग करताना दोन्ही खूप उपयोगी, कारमागे एखादी व्यक्ती किंवा अडथळा असल्यास सेन्सर ड्रायव्हरला अलार्मद्वारे अलर्ट करतो.6 / 10अचानक टायर पंक्चर होतो किंवा फुटतो अशावेळी अपघात टाळण्यासाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम उपयोगी, हे फीचर काही बजेट कारमध्येही आता उपलब्ध. 7 / 10भरधाव कार वळवताना योग्य नियंत्रण राखते, ही यंत्रणा चाकांचा वेग समजते आणि ब्रेक फोर्स वितरित करते. 8 / 10हे फीचरही उपयुक्त ठरते, वेग जास्त असल्यास अलार्म वाजतो.9 / 10समोरासमोरच्या धडकेत कारचे सर्वाधिक नुकसान होते, अनेक गाड्यांचे ए आणि बी पिलर आता रिइनफोर्स्ड स्टीलचे असतात, त्यामुळे कारच्या संरचनेला समोरुन अधिक ताकद मिळते आणि क्रॅश सहन करण्याची क्षमताही वाढते. 10 / 10लहान मुलांसाठी कारमध्ये हे एक महत्वाचे सुरक्षा वैशिष्ट्य. तथापि, भारतातील एंट्री-लेव्हल कारमध्ये हे फीचर मिळत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications