शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Ertiga CNG घेण्याच्या विचारात आहात?, पाहा किती करावं लागेल डाऊनपेमेंट, किती असेल ईएमआय; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 1:41 PM

1 / 8
Maruti Ertiga LXI CNG Car Loan EMI Down Payment: मारुती सुझुकी अर्टिगा सीएनजीची भारतातील 7 सीटर कारमध्ये वेगळी ओळख आहे. अतिशल लोकप्रिय असलेल्या कार्सपैकी ही एक आहे. ही MPV परवडणाऱ्या किमतीत उत्तम लूक आणि अनेक फीचर्ससह ष्ट्चांगले मायलेजही देते. मारुती अर्टिगाचे सीएनजी व्हेरिअंटमध्येही उपलब्ध आहे.
2 / 8
जर तुम्हीही आजकाल तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मारुती अर्टिगा सीएनजी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही ही कार लोनवरही घेऊ शकता. याशिवाय लोनवर घेताना तुम्हाला या गाडीच्या एकूण किंमतीच्या १० टक्के डाऊनपेमेंट करावे लागेल.
3 / 8
यानंतर, तुम्हाला उर्वरित रकमेसाठी बँकेकडून कर्ज मिळेल आणि त्यानंतर तुम्ही ठराविक कालावधीसाठी ठराविक व्याज दराने मासिक हप्ता म्हणजेच EMI भरू शकता. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.
4 / 8
मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या अपडेटेड अर्टिगा फेसलिफ्टला LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या 4 ट्रिम लेव्हलच्या 9 व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. याची किमत 8.35 लाख रुपये ते रु. 12.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी निश्चित करण्यात आली आहे.
5 / 8
मारुती सुझुकीच्या या सर्वाधिक विक्री होणाऱ्या MPV मध्ये 1462 cc चे पेट्रोल इंजिन आहे. ते सीएनजी पर्यायातही उपलब्ध आहे. मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या 7 सीटर MPV च्या CNG व्हेरिअंटचे मायलेज 26.11 किमी/किलो पर्यंत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
6 / 8
त्याच वेळी, Ertiga पेट्रोल व्हेरिअंटचे मायलेज 20.51 kmpl पर्यंत आहे. Ertiga चे CNG ऑप्शन्स VXi CNG आणि Ertiga ZXi CNG आहेत. आपण आज VXi CNG च्या लोन डिटेल्सबाबत माहिती घेणार आहोत.
7 / 8
अर्टिगाच्या सीएनजी ऑप्शनमध्ये व्हिएक्सआय सीएनजीची एक्स शोरूम किंमत 10.44 लाख रूपये आणि त्याची ऑनरोड प्राईज 12.10 लाख रुपये आहे. कार देखोच्या ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार जर तुम्ही अर्टिगाच्या बेस मॉडेलच्या किंमतीच्या १० टक्के म्हणजे 1.21 लाख रूपये डाऊन पेमेंट (ऑन रोड सोबत प्रोसेसिंग आणि फर्स्ट मंथ ईएमआय) फायनॅन्स केलं, तर तुम्हाला 10,89,016 रुपयांचं कार लोन मिळेल.
8 / 8
यानंतर अंदाजे 9.8 टक्के व्याजदरानुसार, पुढील 5 वर्षांसाठी, तुम्हाला दरमहा 23,031 रुपये EMI म्हणजेच हप्ता म्हणून भरावे लागतील. Maruti Ertiga VXI CNG ला वित्तपुरवठा केल्यावर, तुम्हाला 5 वर्षांमध्ये सुमारे 2.93 लाख रुपये व्याजाच्या रुपात भरावे लागतील. वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांप्रमाणे व्याजदर बदलूही शकतात. (टीप - कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित डीलरशिपशी संपर्क साधून पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. तसंच वित्तपुरवठ्याबद्दलही माहिती घेऊनच व्यवहार करावा.)
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन