शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Suzuki अर्टिगासाठी किती करावं लागेल डाऊनपेमेंट, किती असेल EMI; जाणून घ्या एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 11:15 AM

1 / 6
भारतात 7 सीटर MPV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी Maruti Suzuki Ertiga ची इतकी क्रेझ आहे की ती डिसेंबर 2022 मध्ये Baleno नंतर दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार होती. आजकाल बहुतांश लोक फायनॅन्सवर कार घेतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही अर्टिगा घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्या कामाची आहे.
2 / 6
तुम्ही अगदी 1.25 लाखांचे डाउन पेमेंट करून ही कार घरी घेऊन जाऊ शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला मारुती सुझुकी अर्टिगाचे बेस मॉडेल अर्टिगा LXI आणि सर्वाधिक विक्री होणारी मारुती अर्टिगा VXI खरेदी करायची असेल तर किती कर्ज घ्यावं लागेल आणि त्याचा ईएमआय किती असेल याची माहिती देणार आहोत.
3 / 6
LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या 4 ट्रिम लेव्हलवर मारुती सुझुकी अर्टिगा एकूण 7 व्हेरिअंटमध्ये ऑफर केली जाते. Ertiga ची एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख ते 12.79 लाख रुपये आहे. मारुती अर्टिगा पेट्रोल आणि सीएनजी या दोन पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
4 / 6
अर्टिगा पेट्रोल व्हेरिअंटचे मायलेज 20.51kmpl पर्यंत आहे आणि Ertiga CNG चे मायलेज 26.11km/kg पर्यंत आहे. अर्टिंगा गेल्या वर्षी अपडेट करण्यात आली होती, त्यानंतर तो लुक आणि फीचर्सच्या बाबतीत ही कार सर्वांच्याच पसंतीची ठरत आहे.
5 / 6
मारुती सुझुकी अर्टिगा LXI ची एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 9,36,935 रुपये आहे. जर तुम्ही यासाठी 1 लाखांचं डाउनपेमेंट केले तर तुम्हाला 8,36,935 रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल.
6 / 6
जर व्याजदर 9 टक्के असेल आणि कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत असेल, तर तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी दरमहा 17,373 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. मारुती सुझुकी अर्टिगा फायनॅन्सवर घेतल्यानंतर तुम्हाला तब्बल 2 लाख रुपये अधिक व्याजाच्या स्वरूपात द्यावे लागतील.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी