want to go to picnic with friends, family! These cars come under 10 lakhs, some are seven seaters
सग्यासोयऱ्यांसोबत वृक्षवल्लीत जायचेय! 10 लाखांच्या आत येतात या कार, काही सात सीटर By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 7:03 PM1 / 7जागतिक पर्यटन दिन हे निमित्त आहे. परंतू, आपण नेहमीच कुठे ना कुठे तरी मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसोबत फिरायला जात असतो. डोंगररांगा, समुद्रकिनारी, वाळवंटामध्ये किंवा ऐतिहासिक ठिकाणी प्रवास करायचा असो योग्य कार असल्यास प्रवास आरामदायक आणि आनंददायक होतो. कारच्या सेफ्टीबरोबर त्याचे मायलेजही चांगले हवे असते. म्हणजेच कार परवडणारी देखील हवी असते.2 / 7मारूती ब्रेझा ही मारुतीच्या कारपैकी सर्वाधिक सेफ्टी रेटिंगची कार आहे. या कारची किंमत ८.२९ लाख रूपयांपासून सुरु होते. ७-इंच स्मार्ट प्ले स्टुडिओ टचस्क्रिनसह अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्लेसाठी सपोर्ट आहे. एैसपैस केबिन, अधिक स्टोरेज जागा आणि आरामदायी राइड ही वैशिष्ट्ये आहेत. 3 / 7रेनॉ ट्रायबर ही सर्वात स्वस्त सात सीटर कार आहे. या कारची किंमत ६.३३ लाख रूपये आहे. ६२५ लीटर्सचे सर्वात मोठे बूट स्पेस आहे. क्रोम फिनिश एक्स्टीरिअर डोअर हँडल्स आणि नवीन सीट अपहोल्स्टरी देण्यात आली आहे. या कारला ग्लोबल एनसीएपीकडून प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ४-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. फॅमिली मोठी असेल किंवा पाच जणांसाठी मोठी बुटस्पेस हवी असेल तर ही कार चांगली आहे. 4 / 7महिंद्रा एक्सयूव्ही ३०० ही देखील एक चांगला पर्याय आहे. या कारची किंमत ७.९९ लाख रूपये आहे. महिंद्राने नुकतेच एक्सयूव्ही३०० चे नवीन व्हेरिएण्ट लाँच केले आहे. ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स व वायपर्स, स्टीअरिंग मोड्स, रिअर पार्किंग कॅमेरा, फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स आणि सनरूफ आदी देण्यात आले आहे. चांगली प्रशस्त जागा या कारमध्ये आहेय 5 / 7ह्युंदाईची व्हेन्यू ही देखील चांगली कार आहे. ह्युंदाईने आताच एक्टर देखील लाँच केली आहे. व्हेन्यूची किंमत ७.७७ लाख रूपये आहे. कारमध्ये अँड्रॉईड ऑटो, अॅप्पल कारप्ले, रिक्लायनिंग रिअर सीट्स, ऑनबोर्ड वॉईस कमांड्स आणि स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ अशी वैशिष्ट्ये आहेत. ही कार पेट्रोल व डिझेल व्हेरिएण्ट्ससह आयएमटी ट्रान्समिशन पर्यायासह येते.6 / 7रेनॉ कायगर ही देखील एक कमी किंमतीतली मोठी कार आहे. या कारची किंमत ६.४७ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी व ५ स्पीड ईजी-आर एएमटी ट्रान्समिशन देखील देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार २०.६२ किमी/लीटरचे मायलेज देते. ग्लोबल एनकॅपने फोर स्टार रेटिंग दिलेले आहे. चार एअरबॅग्ज, प्री-टेन्शनरसह सीटबेल्ट्स व ड्रायव्हरसाठी लोड-लिमिटर आहे.7 / 7याशिवाय टाटाची नेक्सॉन, सिट्रॉएनची सी३, मारुतीची फ्राँक्स आदी कार देखील आरामदायी प्रवासासाठी चांगल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications