इलेक्ट्रीक स्कूटरची बॅटरी लाईफ किती असते? वापरत असाल किंवा घेणार असाल तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:49 IST
1 / 10पेट्रोल, डिझेलच्या महागड्या दरांना कंटाळून लोक ईलेक्ट्रीक वाहनांकडे वळत आहेत. परंतू, ही इलेक्ट्रीक वाहने काही कमी खर्चिक नाहीत. या इलेक्ट्रीक वाहनांचा ताप एवढा आहे की एकदा का खराब झाली की १५-२० दिवस, महिना कुठेच गेला नाही. कधी ईसीयू खराब, तर कधी बॅटरी एक ना अनेक समस्या. ओलाच नाही तर बजाज चेतकही खराब सर्व्हिसमध्ये काही कमी नाही. अशातच इलेक्ट्रीक स्कूटरचा सर्वात मोठा खर्चिक पार्ट म्हणजे बॅटरी, ती खराब झाली तर किती खर्च येईल हे वादातीत आहे. परंतू, तिची लाईफ किती आहे, हे देखील पाहणे गरजेचे आहे.2 / 10बॅटरीच्या किंमतीत आणखी काही पैसे टाकले तर नवीन स्कूटर येईल अशी सध्या परिस्थिती आहे. वॉरंटी असली तरी देखील कंपन्या काही ना काही कारणे देऊन जी तुम्हाला माहिती नसतात ती देऊन वॉरंटी टाळल्याचेही किस्से आहेत. यामुळे या बॅटरीची लाईफ किती, खरेच तुम्हाला ती परवडणार आहे का किंवा काही पैसे वाचतील म्हणून तुम्ही जर घेत असाल तर पुढचा मोठा खर्च किती वर्षांनी येईल, तोवर तुम्ही त्याहून जास्त खर्च वसूल कराल का असे अनेक प्रश्न असतात. त्याचा विचार करावा लागणार आहे. 3 / 10लोकांना इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी लाइफबद्दल देखील चिंता आहे, बॅटरी मध्येच खराब होईल का किंवा ती किती वर्षे टिकेल? इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती काळ टिकते आणि ती कधी बदलावी हा प्रश्न प्रत्येक ईव्ही वापरकर्त्याच्या मनात येतोच. 4 / 10इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरल्या जातात. त्यांचे आयुष्य हे तीन ते पाच वर्षे एवढेच असते. तरीही तुम्ही योग्य काळजी घेतली आणि नशिबाची साथ असेल तर तुम्ही या बॅटरीचे आयुष्य वाढवू शकता. 5 / 10बॅटरीचे आयुष्य हे तिच्या चार्जिंग सायकलवर मोजले जाते. लिथिअम आयन बॅटरीचे ८०० चार्जिंग सायकल असतात. जर दिवसाला ३०-४० किमी चालविणे असेल आणि बॅटरी जर योग्यरित्या चार्ज केली तर ती आरामात ४-५ वर्षे जाऊ शकते. 6 / 10बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्याने आणि शून्य टक्क्यांपर्यंत डिस्चार्ज केल्याने तिचे आयुष्य कमी होऊ शकते. कारण तुम्ही तिचे सायकल पूर्ण करता. तेच जर तुम्ही २० टक्क्यांच्या वर असताना चार्जिंग केले आणि ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केले तर तिचे लाईफ वाढू शकते. 7 / 10जास्त उष्णता किंवा थंडी बॅटरीच्या कामगिरीवर परिणाम करू शकते. यामुळे बॅटरी उन्हाळ्याच्या दिवसात चार्ज करताना रात्रीच्या वेळी करावी. तसेच फिरून आल्यावर लगेचच चार्जिंगला लावू नये. 8 / 10स्कूटरवर जास्त भार टाकल्याने बॅटरी लवकर खराब होऊ शकते. 9 / 10वारंवार जोरात पिकअप घेतल्याने, वेगाने चालविल्याने आणि अचानक ब्रेकिंगमुळे बॅटरीवर अतिरिक्त भार पडतो.10 / 10इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी जलद डिस्चार्ज होऊ लागली, चार्ज होण्यास जास्त वेळ लागला किंवा तिची कार्यक्षमता कमी झाली, तर ते बॅटरी बदलण्याची वेळ आली आहे असे समजावे.