शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sports Car, Super Car आणि Hyper Car मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या या कार्सचे फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 6:39 PM

1 / 9
फक्त भारतच नाही, तर जगभारातील अनेक देशांमध्ये साध्या कारपासून सुपर आणि हायपर कार पाहायला मिळतात. अनेकदा रस्त्यांवर सुपर कार धावताना पाहताच कारला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमते.
2 / 9
या कार फक्त लूक्समध्येच नाही, तर परफॉर्मंसच्या बाबतीत जबरदस्त असतात. या गाड्यांमध्ये दमदार इंजिन आणि अनेक प्रकारचे फीचर्स दिले असतात. या कार हायपरफॉर्मंससाठी तयार केलेल्या असतात.
3 / 9
लूक्स आणि डिझाइनसोबतच या कार्सना त्यांच्या वेगामुळे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागण्यात आले आहे. या गाड्या सुपर हायपर आणि स्पोर्ट्स कार, अशा तीन विभागामध्ये विभागल्या गेल्या आहेत.
4 / 9
स्पोर्ट्स कार- सामान्य कारच्या तुलनेत याचा वेग खूप जास्त असतो. स्पोर्टी लूक असल्यामुळे या कारला स्पोर्ट्स कार म्हणतात. परफॉर्मंसच्या बाबतीमध्येही ही गाडी इतर गाड्यांना मागे टाकते.
5 / 9
या गाड्यांना चालवणे खूप सोपे असते. बहुतेक स्पोर्ट्स कार मॅन्युअलऐवजी ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह येतात. या गाड्यांना भारतीय रस्त्यांवर चालवणे कठीण जाते, कारण या गाड्यांचा ग्राउंड क्लिअरंस खूप कमी असतो.
6 / 9
सुपरकार्स- अनेकजण गाडी खरेदी करताना लूक आणि डिझाइनवर जास्त लक्ष देतात. प्रीमियम लूक आणि लक्झरी इंटीरिअर असल्यामुळे अशा गाड्यांना सूपर कार्स म्हणतात. स्पोर्ट्सच्या तुलनेत या गाड्यांची किंमत जास्त असते.
7 / 9
परफॉर्मंसच्या बाबतीत ही कार स्पोर्ट्स आणि लक्झरी कारला फेल करते. यात तुम्हाला अनेक अॅडवान्स फीचर्स मिळतात. बुगाती, मर्सडीज आणि बीएमडब्‍ल्यूसारख्या कंपन्या अशाप्रकाच्या कार तयार करतात.
8 / 9
हायपरकार्स- स्पोर्ट्स आणि सुपरनंतर लोक हायपरकार्सला पसंत करतात. याची स्पीड खूप जास्त असते. रेसिंग करणाऱ्या लोकांना अशाप्रकार्या कार आवडतात.
9 / 9
यात अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. फेरारी लँबोर्गिनी आणि मॅक्लारेनसारख्या मोठ्या कंपन्या अशाप्रकारच्या गाड्या तयार करतात.
टॅग्स :Automobileवाहनcarकार