शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Plastic Bottle Trick: सावधान! टायरमध्ये अशी बॉटल अडकलेली दिसली की कारच चोरीला गेली म्हणून समजा; चोरट्यांची नवी ट्रिक...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 3:51 PM

1 / 8
कार तुम्ही कुठेही पार्क करा, त्यातून चोरी, तोडाफोडीच्या गोष्टी होत असतात. कार या नेहमीच चोरांच्या सॉफ्ट टार्गेट असतात. तुम्ही लॉक करत असताना गुपचूप कोणीतरी मागचा दरवाजा उघडू शकतो व तुमची कार अनलॉकच राहू शकते. अशा एका ना अनेक क्लुप्त्या हे चोर वापरत असतात. सध्या एक खतरनाक चोरीची ट्रीक व्हायरल होऊ लागली आहे, ज्यामुळे कारमालकाच्या समोरून कारच चोरीला जाऊ लागली आहे.
2 / 8
काय होते, कार मालक किंवा चालक कार लावून काहीतरी खरेदीला किंवा कामाला जातो. चोरटे त्या कारच्या डाव्या बाजुच्या चाकांमध्ये रस्त्यावर कुठेही पडलेली रिकामी प्लॅस्टिक बॉटल अडकवतात. जेव्हा कार मालक तिथे येतो, तेव्हा तो नेहमी आपल्या बाजुनेच येतो.
3 / 8
यामुळे त्याचे या अडकवलेल्या किंवा चाकाच्या आणि मडगार्डच्या आत टाकलेल्या बॉटलकडे लक्ष नसते. अशाप्रकारची ट्रिक जगभरात वापरली जाऊ लागली आहे. यामुळे कार चालकांनो सावधान रहा...अजून पुढे कशी कार चोरी केली जाते ते येणार आहे.
4 / 8
समजा तुम्ही कार चालक आहात, एकटेच प्रवास करताय. कुठेतरी चहापाणासाठी थांबलात, फ्रेश झालात आणि निघालात. कारकडे आलात तर तुम्ही कोणत्या बाजुने ड्रायव्हरच्या दाराकडे जाता. उजव्या बाजुने वळसा घालून आपल्याच नादात, कधी मोबाईलवर बोलत असता की नाही. इथेच सारे अडते आणि चोरांचे फावते.
5 / 8
जेव्हा तुम्ही कार सुरु करता आणि पुढे नेता तेव्हा चाकाखाली काहीतरी सापडल्याचा किंवा आदळल्यासारखा आवाज येतो. हा आवाज तुमच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच कारच्या त्या बाजुला येतो. तिथली बाजू तुम्हाला दिसत नसते. यामुळे तुम्हाला त्या आवाजाचा हासभासही नसतो.
6 / 8
तुम्हाला वाटते कशावर तरी धडकली किंवा चाक पंक्चर वगैरे झाले. तुम्ही घाबरून कार तशीच बंद करून बाहेर पडता, दारही अनेकदा सताड उघडे ठेवलेले असते. चाकांकडे धाव घेता, गाडीला वळसाही मारता. तीच चोरांची वेळ असते. काहीवेळा तुम्हाला कसला आवाज आला हे शोधण्यातच दोन-चार मिनिटे लागतात.
7 / 8
या वेळात आजुबाजुला चोर असतो, तो कारमध्ये शिरतो आणि ती कार घेऊन पसारही होतो. तुमच्या डोळ्यांदेखत. किंवा तुमच्या कारमधील मौल्यवान वस्तू असलेली बॅग वगैरे घेऊनही पसार होतो. चोराने काय केले, ना डोके लढवले, ना पैसे लावले. रस्त्यावर पडलेली फुकटची बॉटल तुमच्या टायरमध्ये अडकवली आणि तुम्ही कारमधून बाहेर पडताच संधी साधली.
8 / 8
हा चोरीचा प्रकार जगभरात ट्रेंड होऊ लागला आहे. आपल्याकडेही होऊ लागेल किंवा होतही असेल. परंतू जर तुम्ही चौकस असाल तर सावध रहा, कारमध्ये बसण्याआधी चारही चाके तपासा, म्हणजे कार पंक्चर आहे की नाही ते देखील लक्षात येईल आणि असा प्रकार दिसला तर तुम्ही थेट पोलिसांना फोन करा. सावध तो सुखी...
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी