... when the three crores car converted in tank
...जेव्हा तीन कोटींच्या कारचा रणगाडा बनविला By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 3:10 PM1 / 6जगप्रसिद्ध कार कंपनी बेंटलीच्या कारची किंमत काही कोटींमध्ये असते. या आलिशान कारनी जगभरात आपली वेगळी ओळख बनविली आहे. 2 / 6एका महाभागाने बेंटलीच्या कॉन्टिनेंटल जीटी या तब्बल तीन कोटींच्या कारला रणगाड्याची चाके लावली आहेत. 3 / 6रशियामध्ये या लक्झरी कारला एका कारप्रेमीने मॉडिफाय केले आहे. कारची चाके, दरवाजे काढून त्याजागी रणगाड्याचे पट्ट्याची चाके लावली आहेत. 4 / 6कॉन्स्टेंटिन जरुस्की असे त्याचे नाव आहे. त्याने एका टीमसोबत हे काम केले आहे. या कारला त्याने 'अल्ट्राटँक' नाव दिले आहे. 5 / 6कॉन्स्टेंटिनने सांगितले की, या कारला रणगाड्यामध्ये बदलताना अनेक समस्या आल्या. यासाठी सात महिने लागले. 6 / 6अल्ट्राटँकची अनेकदा ऑफ-रोड टेस्ट करण्यात आल्या. ही कार चालविणे सामान्य कार चालविण्यासारखेच आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications