शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विकत कशाला घेताय, १२०० रुपयांत भाड्याने घ्या Royal Enfield; कंपनीचा नवीन प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:22 PM

1 / 10
Royal Enfield बाईकचे जगभरात चाहते आहेत, विशेषत: भारतात या बाइकला रुबाबदार स्वारी म्हटलं जातं. रॉयल एनफिल्ड बाईक्स अनेक दशकांपासून भारतीयांच्या हृदयावर राज्य करत आहेत. पण मोठ्या संख्येने चाहते असूनही, जास्त किंमतीमुळे रॉयल एनफिल्डची स्वारी करणे अजूनही सर्वांसाठी शक्य नाही.
2 / 10
पण जर तुम्हाला कमी खर्चात रॉयल एनफिल्डच्या दमदार ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला बाईक विकत घेण्याची गरज नाही, तर तुम्ही कंपनीच्या रेंटल प्रोग्राममधून (Royal Enfield Rental Program) याचा फायदा घेऊ शकता.
3 / 10
हा एक प्रकारे सामान्य भाड्याचा कार्यक्रम आहे, जसे की आपण नावावरूनच समजू शकता, तुम्ही कंपनीच्या बाइक भाड्याने घेऊ शकता. पण त्यातही काही अटी आणि नियम आहेत. पहिली अट म्हणजे कंपनीद्वारे हा उपक्रम केवळ देशातील काही निवडक शहरांमध्येच उपलब्ध आहे. ज्यात, दिल्ली, जयपूर, जैसलमेर, हरिद्वार, चेन्नई, डेहराडून, मनाली, धर्मशाला आणि लेह इ समावेश आहे.
4 / 10
एकूणच, देशातील २५ शहरांमध्ये तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता, ज्याचा भविष्यात आणखी विस्तार करण्याची योजना आहे. याबाबतची सविस्तर माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. सध्या ४० वेगवेगळ्या ऑपरेटरद्वारे सुमारे ३०० मोटारसायकली भाड्याने उपलब्ध आहेत.
5 / 10
तुम्ही रॉयल एनफील्ड बाईक अगदी कमी किमतीत दररोज भाड्याने घेऊ शकता. कंपनीने त्यांची ही स्कीम प्रक्रिया अतिशय सोपी आणि युजर फ्रेंडली बनवली आहे. ज्यांना यात स्वारस्य आहे अशांनी रॉयल एनफिल्ड रेंटल वेबसाइटला भेट देणे
6 / 10
या वेबसाईटवर आल्यावर त्यांचे शहर, पिक-अप तारीख, वेळ तसेच ड्रॉप-ऑफ तारीख आणि वेळ निवडणे आवश्यक आहे. साइट निवडलेल्या कालावधीसाठी उपलब्ध मॉडेल्स आणि संबंधित भाड्याच्या किमती तुम्हाला दाखवेल. येथे दररोजचे भाडे तुम्हाला दाखवले जाईल.
7 / 10
यानंतर युजरला ऑनलाइन फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. फॉर्म सबमिट केल्यानंतर, ऑपरेटर डिटेल्स दिले जातात. भाडे ऑपरेटर बाइक्सनुसार काही रक्कम देखील जमा करू शकतात, जी तुम्हाला रिफंड केली जाईल. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे
8 / 10
वेगवेगळ्या ठिकाणांनुसार आणि बाइक्सनुसार ही रक्कम बदलू शकते. येथे बाईक निवडल्यानंतर, तुम्हाला बाइकचे तपशील देखील दाखवले जातील, जसे की बाइक किती जुनी आहे किंवा ती किती किलोमीटर चालली आहे आणि इतर माहिती
9 / 10
तुम्ही कंपनीच्या अधिकृत रेंटल वेबसाइटवर (https://www.royalenfield.com/in/en/rentals/) जाता तेव्हा, येथून तुम्हाला दिलेल्या शहरातील एक शहर निवडावे लागेल.
10 / 10
याठिकाणी आम्ही दिल्ली शहर निवडले आणि नियोजित तारखेनुसार रॉयल एनफील्ड बुलेट दररोज १२०० रुपये भाड्याने उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय रॉयल एनफिल्ड हिमालयनचे भाडे १५३३ रुपये प्रतिदिन होते.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्ड