शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CNG भरताना गाडीतून खाली का उतरतात लोक? यामागे एक नाही, तर चार आहेत कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 2:19 PM

1 / 6
सध्या पेट्रोल डिझेलचे दर अधिक आहे. सीएनजीच्या किंमतीही वाढल्या असल्या तरी तुलनेनं काहीशा प्रमाणात सीएनजीचे दर कमी आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये सीएनजीच्या कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सीएनजी कारमुळे तुमच्या खिशावरचा भार कमी होत असला तरी ती वापरताना तुम्हाला अनेक खबरदारीही घ्यावी लागते.
2 / 6
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की इंधन पंपावर कारमध्ये सीएनजी भरताना सगळ्यांना गाडीतून बाहेर पडावं लागतं. अनेकांच्या मनात प्रश्नही येत असेल की असं का? या नियमामागे एक नाही तर चार कारणे आहेत. जाणून घेऊया ती कारणं.
3 / 6
अपघाताची भीती - याचे सर्वात मोठं आणि पहिलं कारण म्हणजे अपघाताची भीती. सीएनजी कारमध्ये अपघाताचा धोका बाकीच्या कारपेक्षा जास्त असतो. गॅस सिलिंडरमध्ये कोणत्याही प्रकारची गळती झाल्यास कारमध्ये स्फोट होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या जीवालाही धोका आहे.
4 / 6
बोनेटमध्ये नोझल - बहुतेक वाहने आता फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी पर्यायासह येतात, तर काही कार्समध्ये बाजारपेठेतून सीएनजी किट लावून घेतले जाते. अशा कारमध्ये सीएनजी फिलर नोजल बोनेटच्या आत असते.
5 / 6
मीटरचं मॉनिटरिंग - सीएनजी पंपाचे मीटर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत थोडे वेगळे आहे. तसंच कोणत्याही प्रकारची हेराफेरी टाळण्यासाठी मीटर पाहणे आवश्यक आहे. म्हणूनच कारमधून बाहेर पडणे चांगले.
6 / 6
सीएनजीचा वास - सीएनजीच्या वासामुळेही तुम्हाला त्रास होऊ शकतो. हे विषारी नसून त्याच्या संपर्कात आल्याने तुम्हाला चक्कर येऊ शकते. त्यामुळेच सीएनजी भरताना गाडीतून बाहेर पडणे चांगले.
टॅग्स :carकार