शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कशाला घेतली, काय गरज होती, आईच काटकसर करते; तिच्यासाठी ५ इलेक्ट्रिक स्‍कूटर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 2:32 PM

1 / 7
आज मातृदिन आहे. घरातील बाजार आणायचा झाला, भाजीपाला आणायचा झाला की तुमच्या बाबांपेक्षा आईच जाऊन घेऊन येते. कारण तिला मोलभाव करता येतो, काटकसर करत संसार करता येतो. मग तिचे जर पेट्रोलवर चार पैसे वाचणार असतील तर. काय हरकत आहे तिला इलेक्ट्रीक स्कूटरची भेट द्यायला...
2 / 7
इलेक्ट्रीक स्कूटर महागड्याही आहेत आणि स्वस्तही. आम्ही तुम्हाला आज पाच पर्याय सांगणार आहोत. जे तुम्ही तुमच्या आईला गिफ्ट म्हणून देऊ शकता.
3 / 7
बाऊंस इन्फिनिटीच्या स्कूटरची किंमत ५९,९९९ रूपये आहे. स्‍वॅपेबल २ केडब्‍ल्‍यूएच ४८ व्‍होल्‍ट ३९ एएच बॅटरी पॅकसह हब मोटर आहे. याचा वेग ६५ किमी प्रतितास आहे. एका चार्जमध्‍ये ८५ किमीची रेंजचा कंपनी दावा करते. बॅचरी चार ते पाच तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. इन्फिनिटी ई१ मध्‍ये ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी, जिओफेन्सिंग, अॅण्‍टी-थेफ्ट व टो अलर्ट्स आणि पंक्‍चर झाल्‍यास स्‍कूटर पुढे नेण्‍यासाठी ड्रॅग मोड अशी वैशिष्ट्ये आहेत.
4 / 7
हिरोच्या या स्कूटरची किंमत ६२,१९० रूपये आहे. ऑप्टिमा सीएक्‍समध्‍ये ५५० वॅट बीएलडीसी मोटर आहे, जी १.२ बीएचपीची शक्‍ती देते. तसेच या इलेक्ट्रिक स्‍कूटरमध्‍ये ५२.२ व्‍होल्‍ट, ३० एएच लिथियम फॉस्‍फेट बॅटरी आहे, जी ४ ते ५ तासांमध्‍ये चार्ज होते. कंपनीने सिंगल व डबल बॅटरी व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये स्‍कूटर सादर केली आहेडबल बॅटरी असलेले व्‍हेरिएण्‍ट एका चार्जमध्‍ये १४० किमीची रेंज देते आणि प्रतितास ४५ किमीचा वेग घेते.
5 / 7
अॅम्पियरच्या या स्कूटरची किंमत ७३,९९९ रूपये आहे. ही स्‍कूटर प्रतितास ५५ किमी वेग प्राप्त करते. १.२ केडब्‍ल्‍यू मोटर आहे, तसेच ६० व्‍होल्‍ट, ३० एएच बॅटरी आहे जी ६ ते ७ तासांमध्‍ये चार्ज होते. १२१ किमीची रेंज देते.
6 / 7
ओडीसीच्या या स्कूटरची किंमत ७७,२५० रूपये आहे. बॅटरी तीन ते चार तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. तसेच ही स्कूटर ७५ किमीची रेंज देते. या स्कूटरमध्ये मोठी बूट स्‍पेस देण्यात आली आहे. तसेच अॅण्‍टी-थेफ्ट लॉक देखील देण्यात आले आहे.
7 / 7
हिरो इलेक्ट्रिकच्या या दुसऱ्या स्कूटरची किंमत ८०,७९० रूपये आहे. १२०० वॅट मोटरसह ७२ व्‍होल्‍ट २६ एएच बॅटरी पॅक देण्यात आले आहे. बॅटरी ५ तासांमध्‍ये चार्ज होते. या इलेक्ट्रिक स्‍कूटरची प्रतितास ४५ किमीचा वेग आहे. ही स्कूटर ९० किमीची रेंज देते.
टॅग्स :Mothers Dayमदर्स डे