Will hit Ola! Super Soco CT3 Electric Maxi Scooter has 180 km range; see Features ...
Ola ला टक्कर देणार! 180 किमी रेंज देणारी स्कूटर आली; जाणून घ्या फिचर्स... By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 4:13 PM1 / 8Super Soco CT3 Electric Maxi Scooter Price Features: चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रीक स्कूटर कंपनी Super Soco आपल्या पहिल्या मॅक्सी स्कूटर Super Soco CT3 वरून पडदा हटविला आहे. या स्कूटरमध्ये एक नाही तर अनेक खास बाबी आहेत. यामध्ये याची रेंजही आहे. 2 / 8सुपर सोको सीटी३ ची बॅटरी रेंज ही सिंगल चार्जला 180 किमी आहे. सुपर सोको सीटी3 ची टक्कर BMW CE04 Maxi scooter तसेच भारतातील ओला स्कूटरशी होईल. ओला आपली स्कूटर परेदशांतही विकणार आहे. 3 / 8Super Soco CT3 Electric Maxi Scooter ची किंमत अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, लवकरच ही स्कूटर चीन आणि युरोपीय बाजारांत लाँच केली जाणार आहे. येत्या काळात ही स्कूटर भारतीय बाजारात देखील येण्याची शक्यता आहे. कारण येथे इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी वाढली आहे. 4 / 8सुपर सोको सीटी-3 च्या लुक आणि फीचर्सबाबत बोलायचे झाले तर तिचा फ्रंट फेस खूप मोठा आहे. यामध्ये ट्विन एलईडी हेडलाईट, मोठा वायझर लावण्यात आला आहे. मागील भाग देखील मोठा आहे. यामध्ये एलईडी टेललँप आणि एलईडी इंडिकेटर्स लावण्यात आले आहेत.5 / 8Super Soco CT-3 मध्ये 7 इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीला सपोर्ट करतो. रिव्हर्स पार्किंग सेन्सरही आहे. 5 स्पोक अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक फोर्क. ट्विन गॅस चार्ज शॉक ऑब्झर्व्हर, डिस्क ब्रेक, एबीएससारखे फिचर्स आहेत. 6 / 8सीटी 3 मध्ये 18kW ची इलेक्ट्रीक मोटर आणि 7.2kWh ची बॅटरी पॅक देण्यात आली आहे. ही बॅटरी 3 तासांच फुल चार्ज होते. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 180 किमी रेंज देते. तसेच टॉप स्पीड हा 125 kmph आहे.7 / 8भारतात ईलेक्ट्रीक स्कूटरची मागणी वाढू लागल्याने अनेक कंपन्या या क्षेत्रात उडी घेत आहेत. लोकही ईलेक्ट्रीक स्कूटर धडाधड विकत घेऊ लागले आहेत. गेल्या महिन्यात ओला ईलेक्ट्रीक आणि सिंपल एनर्जीने दोन स्कूटर लाँच केल्या आहेत. 8 / 8ओलाच्या स्कूटरला तुफान प्रतिसाद मिळाला असून सिंपलच्या स्कूटरलाही मोठी मागणी झालेली आहे. हिरो आणि टीव्हीएस देखील त्यांच्या स्कूटर लाँच करणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications