शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'ही' महिला नसती तर कदाचित 'Mercedes Benz' वाहन निर्माता कंपनीच अस्तित्वात नसती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 2:32 PM

1 / 10
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो असं म्हटलं जातं. जगातील सर्वात लग्झरी वाहन निर्माता कंपनी मर्सिडिज बेंझच्या यशामागे एका महिलेची भूमिका महत्त्वाची आहे. या महिलेमुळेच मर्सिडिज नावारुपाला आली. ती नसती तर कदाचित ही कंपनी अस्तित्वातही आली नसती.
2 / 10
बर्था बेंझ ( Bertha Benz ) बर्था बेंझ या महिलेने पहिल्यांदा जगाला कारची ओळख करून दिली. कार्ल फ्रेडरिक बेंझ ( Carl Benz ) ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्यांच्या विशेष योगदानासाठी प्रसिद्ध आहे. जर्मनीतील कार्ल बेंझ हे व्यवसायाने एक ऑटोमोटिव्ह इंजिनिअर आणि इंजिन डिझाईनर होते. १९८८ मध्ये त्यांनी पहिली कार बेंझ पेटेंट मोटर वॅगर तयार केली होती.
3 / 10
पण ही कार कधी रोडवर धावेल वाटलं नव्हते. या कारला जगातील पहिली मॉर्डन प्रॅक्टिकल कार म्हणून ओळखले जाते. बेंझ भलेही त्यांच्या कारबद्दल साशंक होते. परंतु एक महिला होती जी पूर्ण विश्वासाने ही कार रस्त्यावर धावू शकते असं सांगत होती.
4 / 10
ही महिला दुसरी कुणी नसून त्यांची पत्नी बर्था बेंझ होती. कार्ल यांच्या यशामागे पत्नी बर्था बेंझ यांचे मोठे योगदान आहे. जर बर्था बेंझ नसत्या तर त्यांच्या पतीने इतका मोठा निर्णय कधी घेतला नसता. कार्ल बेंझ यांनी पहिली कार बनवली परंतु ती विकण्यात यश आले नाही.
5 / 10
कार्ल बेंझ आणि पत्नी बर्था बेंझ हे निराशेत होते. जवळपास ३ वर्ष बाजारात असलेली ही कार विक्री झाली नव्हती. कदाचित ही कार कुणी वापरली नसावी त्यामुळे ती खरेदी केली जात नसेल असं बर्था बेंझ यांना वाटले. त्यामुळे त्यांनी स्वत: ही कार चालवण्याचा निर्णय घेतला.
6 / 10
एकदा सकाळी बर्था बेंझ उठल्या आणि कार्ल यांना कुठलीही माहिती न देता त्यांनी कार गॅरेजमधून बाहेर काढली. बर्था बेंझ त्यांच्या २ मुलांना घेऊन ऐतिहासिक प्रवासावर निघाल्या. रस्त्यावर ३ चाकांचे वाहन पाहून अनेकांना विश्वास बसत नव्हता.
7 / 10
रस्त्यावर धावणाऱ्या या कारचं स्टेअरिंग एका महिलेच्या हातात होते हे बघून अनेकजण आश्चर्यचकीत झाले. बर्था बेंझ ज्या रस्त्याने जात होती प्रत्येक जण त्यांच्या कारकडे बघत होता. परंतु अचानक जगातील पहिली कार अचानक बंद पडली. बर्था बेंझ यांनी खाली उतरून कारचं निरिक्षण केले तेव्हा एका जागेवरून काही लिकेज होत असल्याचे दिसले.
8 / 10
भलेही कार बंद पडली परंतु बर्था बेंझ निराश न होता. ड्रेसच्या कापडाचा एक तुकडा कापून त्यांनी लिकेज पाईप बंद केली. त्यानंतर कार पुन्हा सुरू झाली. बर्था यांनी १०६ किमी अंतर कापले. याच प्रवासामुळे ऑटो इंडस्ट्रीचा प्रवास कधीही न संपणाऱ्या दिशेने सुरू झाला.
9 / 10
काही रिपोर्टनुसार, बर्था बेंझ ही कार घेऊन त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेल्या होत्या असा दावा करण्यात येतो. परंतु जनतेला दाखवण्यासाठी हा प्रवास केला. त्यांच्या पतीने बनवलेल्या कारचा अविष्कार सिद्ध करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्षात काम केले.
10 / 10
बर्था बेंझ या घरी परतल्या तेव्हा त्यांनी कार चालवताना आलेला अनुभव आणि रस्त्यात आलेल्या समस्या याबाबत पती कार्ल बेंझ यांना सांगितले. त्यानंतर या सर्व अडथळा दूर करण्यासाठी आणि कार आणखी चांगली बनवण्यासाठी पतीने काम केले. त्यानंतर मर्सिडिज बेंझ ही जगातील सर्वात लग्झरी कार कंपन्यांपैकी एक झाली.
टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झ