शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खत्तरनाक... बाईक आहे की रॉकेट?; इंजिन पाहून उडालच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 12:37 PM

1 / 9
सुपरबाईक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी ट्रायम्फने चक्क 2500 सीसीचे इंजिन असलेली बाईक लाँच केली आहे. महत्वाचे म्हणजे या बाईकचे नावही त्यांनी रॉकेट 3 टीएफसी असे ठेवले आहे. हे इंजिन आजवरचे बाईकमध्ये वापरलेले सर्वात मोठे इंजिन आहे.
2 / 9
या बाईकपेक्षा तिच्या इंजिनाचीच जास्त चर्चा रंगली आहे. तीन सिलिंडर असलेले हे इंजिन 167.67 बीएचपी ताकद आणि 221 एनएम टॉर्क निर्माण करते. हे केवळ सर्वात ताकदवर इंजिनच नाही तर सर्वाधिक टॉर्क उत्पन्न करणारे इंजिन म्हणून नावाजले गेले आहे. टीएफसीमध्ये सिक्स स्पीड हेलिकल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. गिअर स्मूथ पडण्यासाठी हायड्रॉलिक क्लच देण्यात आला आहे.
3 / 9
या इंजिनाच्या आकारावरून हे इंजिन जड असेल असाच विचार करत असाल. तर इंजिनाच्या प्रमाणापेक्षा हे इंजिन थोडे जडच आहे. मात्र, जुन्या रॉकेट 3 च्या इंजिनापेक्षा वजनाने हलके आहे.
4 / 9
Triumph च्या कारखान्यात हे इंजिन बनविण्यात आले आहे. टिटॅनिअमचा वापर करून या इंजिनाचे व्हॉल्व्ह बनविण्यात आले आहेत. ऑईल टँक, ड्राय सम्प यामुळे मुळच्या रॉकेट 3 पेक्षा 40 किलोंनी हलके आहे. यामुळे बाईकचे वजनही कमी झाले आहे.
5 / 9
एवढे मोठे इंजिन असल्याने त्याचा आवाजही तेवढाच असणार, नाही का... होय परंतू, त्यांना सायलेन्सरमध्ये काही बदल करत, कार्बन फायबरचा वापर केल्याने आवाजाची तिव्रता कमी झालेली आहे.
6 / 9
या इंजिनाबरोबरच या बाईकचे डिझाईनही लोकांना आकर्षित करत आहे. Rocket 3 TFC ही मशीनवर नाही तर हातांनी बनविलेली आहे. इंजिनाला तीन एक्स्झॉस्ट सायलेन्सर दिलेले आहेत.
7 / 9
जाड 240 सेक्शनचे टायर आणि अॅल्युमिनिअम कास्टिंग केलेले व्हील्स रस्त्यावरील जहाज बनवितात.
8 / 9
ही बाईक चालविण्यासाठी कारप्रमाणेच चार मोड देण्यात आले आहेत. यासाठी बाईकच्या इन्स्ट्रुमेंट पॅनेलवर पर्याय आहेत. स्पोर्ट, रेन, रोड आणि रायडरने त्याचा बनविलेला मोड असे मोड आहेत. बाकी एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रुझ कंट्रोल आणि हिल होल्ड असे पर्याय दिलेले आहेत.
9 / 9
या अवाढव्य आणि वेगवान बाईकचे उत्पादनही मर्यादित म्हणजेच 750 एवढेच करण्यात येणार आहे. आणि यापैकी बऱ्याच बाईकची आगाऊ बुकिंगही झालेली आहे.
टॅग्स :Triumphट्रायम्फmotercycleमोटारसायकल