The worlds largest e scooter production unit 3000 plus AI robots see how OLAs factory looks like
जगातील सर्वात मोठं e-scooter प्रोडक्शन युनिट; 3000+ AI रोबोट्स, पाहा कशी आहे OLA ची फॅक्टरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 5:58 PM1 / 15कॅब सेवा देणाऱ्या ओलानं जेव्हा इलेक्ट्रीक स्कूटर्सच्या बाजारात पाऊल ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर कंपनीनं अनेक आकर्षक रंगांमध्ये आपल्या स्कूटर्सचे फोटो सादर केले तेव्हा ही स्कूटर अतिशय जबरदस्त असू शकते अशी सर्वांची धारणा झाली. 2 / 15यासाठी कंपनीला प्रोडक्शन बॅकअप अतिशय तगडं असणं आवश्यक होतं. यासाठी OLA नं यापूर्वीपासूनच तयारी केली होती. ओलाचं हे फॅक्टरी युनिट सर्वात मोठं स्कूटर प्रोडक्शन युनिट मानलं जात आहे.3 / 15गेल्या वर्षी Ola नं तामिळनाडू येथील पोचमपल्लीच्या कृष्णागिरीमध्ये प्रोडक्शन युनिट उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी कंपनीनं 2,400 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची तयारीही दाखवली होती. तसंच आता कंपनी जगातील सर्वात मोठं इलेक्ट्रीक स्कूटर प्रोडक्शन युनिट झालं आहे. 4 / 15500 एकरच्या विशाल परिसरात पसरलेल्या या फेक्ट्रीमध्ये एका वर्षात जवळपास 10 मिलियन युनिट्स म्हणजेच 1 कोटी स्कूटर्सचे प्रोडक्शन करता येऊ शकतं. याणध्ये इंटिग्रेटेड फॅसिलिटीज आहेत, ज्या ठिकाणी उत्पादन, बॅटरी आणि सप्लाय पार्कच्या नजीक ९० टक्के कामांच्या नजीकच केलं जाणार आहे.5 / 15500 एकर परिसरात एकट्या 43 एकरमध्ये प्रोडक्शन युनिटचा बॉक्स तयार करण्यात आला आहे. हा मेगा ब्लॉक सर्वात मोठा असल्याचं मानलं जात आहे. कंपनीकडून करण्यात आलेल्या तुलनेत 20 एकर दिल्ली एअरपोर्टचं T3 टर्मिनल 20 एकरांचं आहे. तर मुंबई एअरपोर्टचं टर्मिनल T2 २४ एकरांचं आहे. 6 / 15याचप्रकारे बंगळुरूचंही टर्मिनल 26 एकरांमध्ये बनलं आहे. यावरून तुम्हाला Ola चा मेगाब्लॉक जो 43 एकरांमध्ये तयार करण्यात आला आहे, तो किती मोठा असेल याची कल्पना येते. 7 / 15प्रोडक्शन प्रोसेसला ऑप्टीमाईज करण्यासाठी कंपनीत 3000 पेक्षा अधिक AI(Automated Intelligence) ड्रिवन रोबोट्सची मदत घेता येऊ शकते. अनेक टप्प्यांमध्ये याद्वारे प्रोडक्शनचं काम केलं जातं. 8 / 15Ola नं रविवारी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून देशांतर्गत बाजारात आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर Ola S1 लाँच केली. 9 / 15एक स्कूटर तयार करण्यासाठी या ठिकाणी सरासरी २ सेकंदाचा वेळ लागतो. प्रोडक्शनला गती देण्यासाठई 10 प्रोडक्शन लाईन तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी गंज न लागणार रंगाचं शॉपही आहे. एंड टू एंड ऑटोमेटेड कन्व्हेअर मुव्हमेंट. वेल्डिंग शॉपही आहे, जे प्रोडक्शनच्या प्रत्येक पातळीवर ऑटोमेटेड पद्धतीनं काम करतं. 10 / 15भारतीय बाजारपेठेत Ola S1 ची किंमत 85,099 रूपये, तर Ola S1 Pro ची किंमत 1.10 लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत दिल्लीनुसार देण्यात आली आहे. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून देण्यात आलेल्या दोन्ही किंमतींचा समावेश करण्यात आला आहे.11 / 15गेल्या अनेक दिवसांपासून बरेच जण या इलेक्ट्रीक स्कूटरच्या प्रतीक्षेत होतं. परंतु अखेर कंपनीनं यावरून पडदा उठवला. कंपनीनं ही स्कूटर दोन व्हेरिअंट S1 आणि S1 Pro मध्ये लाँच केली आहे. 12 / 15या इलेक्ट्रीक स्कूटरची सर्वात कमी किंमत ही गुजरात मध्ये आहे. या ठिकाणी Ola S1 या मॉडेलची किंमत 79,999 रूपये इतकी आहे. तर Ola S1 Pro या मॉडेलची किंमत 109999 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.13 / 15तर दुसरीकडे महाराष्ट्रात या स्कूटरच्या Ola S1 या व्हेरिअंटची किंमत 94,999 रूपये आणि Ola S1 Pro या व्हेरिअंटची किंमत 1,24,999 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. 14 / 15दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान व्यतिरिक्त अन्य राज्यांमध्ये Ola S1 व्हेरिअंटची किंमत 99,999 रूपये आणि Ola S1 Pro या व्हेरिअंटची किंमत 1,29,999 रूपये इतकी निश्चित करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. 15 / 15ओलानं आपल्या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये जबरदस्त फीचर्स सामिल केले आहे. तसंत हे फीचर्स सध्या देशात उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्कूटरमध्ये पाहायला मिळत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications