लाँच नंतर काही दिवसांतच सर्व गाड्या SOLD OUT; Yamaha च्या या गाडीला जबरदस्त मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 19:39 IST
1 / 7Yamaha Motor India ने काही महिन्यांपूर्वी देशात नवीन Aerox 155 MotoGP स्कूटर लाँच केली होती. परंतु अवघ्या काही दिवसांतच स्कूटर पूर्णपणे सोल्ड आउट झाली आहे. 2 / 7हे MotoGP मॉडेल लिमिटेड एडिशन म्हणून लाँच करण्यात आलं होतं. त्यामुळे ते देशात पुन्हा लाँच होण्याची शक्यता कमी आहे. Aerox 155 MotoGP स्कूटर रेसिंग ब्लू, ग्रे वर्मिलियन आणि मोटोजीपी एडिशन या 3 कलर व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात आली होती.3 / 7Aerox 155 MotoGP मध्ये अन्य व्हेरिअंट्सप्रमाणेच LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स, सिंगल चॅनेल ABS, 5.8-इंच डिस्प्ले स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, शटर लॉक, डिजिटल क्लॉक, स्पीडोमीटर, टॅकोमीटर आणि ट्रिपमीटर, ऑटोमॅटिक स्टार्ट आणि स्टॉप सिस्टम सारखे फीचर्सही देण्यात येतात.4 / 7याशिवाय यात स्मार्ट मोटर जनरेटर सिस्टीम, टीसीआय इग्निशन, पोझिशन लाइट, व्हीव्हीए, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ स्विच, अंडरबोन चेसिस, फ्रंट डिस्क-ब्रेक, रिअर ड्रम-ब्रेक, यामाहा मोटरसायकल Y-कनेक्ट अॅप फीचरसह उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.5 / 7Aerox 155 MotoGP मध्ये इतर व्हेरिअंटप्रमाणे 155 cc पेट्रोल इंजिन मिळते. ही स्कूटर 15PS पॉवर आणि 13.9Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह व्ही-बेल्ट ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 6 / 7या स्कूटरची किंमत 1.29 ते 1.32 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर ही स्कूटर 48.62 kmpl चं मायलेज देते.7 / 7Yamaha Motor India ने अलीकडेच देशातील आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये Aerox 155 मोटो स्कूटरचाही समावेश आहे. R15 बेस्ड स्कूटर आता 2000 रुपयांनी महाग झाली आहे.