शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Yamaha ने लॉन्च केली जबरदस्त बाईक; पाहताच RX100 ची आठवण येईल, पाहा Photos...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 4:21 PM

1 / 8
Yamaha GT150 Fazer : Yamaha ची RX100 बाईक बंद होऊल अनेक वर्षे झाली आहेत, पण या बाईकची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. आजही बाजारात जुन्या RX100 बाईक्सना प्रचंड मागणी असते. ही बाईक री-लॉन्च होणार असल्याच्या बातम्याही वेळोवेळी व्हायरल होत असतात. यातच आता कंपनीने एक नवीन बाईक लॉन्च केली आहे, जी दिसायला RX100 प्रमाणेच दिसते.
2 / 8
या नवीन बाईकचे नाव Yamaha GT150 Fazer आहे, कंपनीने या बाईकला RX 100 प्रमाणेच क्लासिक रेट्रो लुक दिला आहे. विशेष म्हणजे, कंपनीने या बाईकमध्ये 150cc चे इंजिन दिले आहे. त्यामुळे ही गाडी Bajaj Pulsor 150 ला टक्कर देईल, असे म्हटले जात आहे.
3 / 8
या बाईकसाठी भारतीयांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण, ही बाईक सध्या चिनी मार्केटमध्ये लॉन्च केरण्यात आली आहे. या बाईकची किंमत 13,390 युआन म्हणजेच 1.60 लाख रुपये(भारतीय) आहे. ही बाईक व्हाईट, डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि निळ्या रंगात आणली आहे.
4 / 8
कंपनीने बाईकला स्पोर्टी लूक देण्यासाठी फेंडर, अलॉय व्हील, एक्झॉस्ट आणि सस्पेंशन काळ्या रंगात ठेवले आहेत. ही बाईक मॉडिफाईड RX100 प्रमाणे दिसते. त्यामुळे भारतात लॉन्च झाल्यावर या बाईकला तरुणांकडून प्रचंड मागणी मिळण्याची शक्यता आहे.
5 / 8
बाईकला क्लासिक लूक देण्यासाठी हेडलॅम्प, रियर व्ह्यू मिरर आणि टर्न सिग्नलला गोल आकार देण्यात आला आहे. इतर फीचर्समध्ये LED लाईट्स, 12V DC चार्जिंग सॉकेट, टीयरड्रॉप आकाराची इंधन टाकी, लेदर सीट्स, ट्रॅकर स्टाइल साइड पॅनेल्स यांचा समावेश आहे.
6 / 8
यात संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल देण्यात आले आहे. बाईकच्या सीटची उंची 800 मिमी आहे. बाइकला एक लांब सीट मिळते, ज्यामध्ये दोन लोक आरामात बसू शकतात. बाईक मुख्यत्वे शहरातील प्रवासासाठी असेल, पण लाईट ऑफ रोडिंगदेखील करता येईल.
7 / 8
Yamaha GT150 Fazerचे इंजिन- Yamaha GT150 Fazer बाईकमध्ये 149cc इंजिन दिले आहे, जे 7,500 rpm वर 12.3 hp ची कमाल पॉवर आणि 12.4 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकमध्ये 18-इंचाची चाकं देण्यात आली आहेत.
8 / 8
ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहेत. या बाईकचे वजन 126 किलो आणि इंधन टाकीची क्षमता 12.5 लीटर आहे. ही बाईक भारतात कधी लॉन्च होईल, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, जेव्हा ही भारतात लॉन्च होईल, हिला ग्राकंकाडून चांगली मागणी मिळणार हे निश्चित.
टॅग्स :Automobileवाहनyamahaयामहाbikeबाईक