शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

RTO मध्ये टेस्ट दिल्याशिवायच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; पाहा काय आहे प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 4:02 PM

1 / 10
आपण ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचा विचार करत असल्यास आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा (RTP) प्रतीक्षा कालावधी आणि लांब रांगा टाळण्यासाठी इच्छित असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
2 / 10
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिकृत चालक प्रशिक्षण केंद्रांच्या नियमांना अधिसूचित केले आहे.
3 / 10
या मान्यताप्राप्त केंद्रांमधील उमेदवारांना उच्च दर्जाचे ड्रायव्हिंग कोर्स उपलब्ध करुन दिले जातील. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवाराला ड्रायव्हिंग लायसन्स घेताना ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक असणार नाही.
4 / 10
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे म्हणणे आहे की या प्रशिक्षण केंद्रांमध्ये सिम्युलेटर आणि उमेदवारांना उच्च-गुणवत्तेचे प्रशिक्षण देण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक देण्यात येतील.
5 / 10
हे नवे नियम १ जुलै २०२१ पासून लागू होतील. दरम्यान, या केंद्रांना इंडस्ट्री स्पेसिफिक स्पेशलाईज्ड ट्रेनिंग देण्याची परवानगी दिली जाईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
6 / 10
मंत्रालयाचे म्हणणे आहे की कुशल वाहनचालकांची कमतरता हा इंडियन रोडवे सेक्टरमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि रस्ते नियमांची माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात.
7 / 10
अधिकृत चालक प्रशिक्षण केंद्रांना मान्यता ही केवळ ५ वर्षांसाठी देण्यात येणार आहे. याशिवाय त्याचं नूतनीकरण करणंही शक्य आहे.
8 / 10
अधिकृत ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्समध्ये लाईट मोटर व्हेईकल ड्रायव्हिंग कोर्सचा कालावधी हा कोर्स सुरू झाल्याच्या तारखेपासून ४ आठवड्यांमध्ये जास्तीतजास्त २९ तासांचा असेल.
9 / 10
दरम्यान, मध्यम आणि हेवी मोटर व्हेईकलचा ड्रायव्हिंग कोर्सचा कालावधी सहा आठवड्यांमध्ये जास्तीतजास्त ३८ तासांचा असेल.
10 / 10
लाईट मोटर ड्रायव्हिंग कोर्स आणि मध्यम, हेवी मोटर कोर्सदेखील थेअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये विभागला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसcarकारbikeबाईकroad transportरस्ते वाहतूक