शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साऊथच्या सुपरस्टारचं पी.व्ही. सिंधूला 80 लाखांचं गिफ्ट, पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 15:05 IST

1 / 6
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
2 / 6
शिवाय तिनं जागतिक स्पर्धेत दोन कांस्य व दोन रौप्यपदकही जिंकले आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक पाच पदकांच्या कमाईचा भारतीय बॅडमिंटनपटूचा विक्रमही सिंधूच्याच नावावर आहे.
3 / 6
तेगलू आणि बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यानं सिंधूच्या या विक्रमी कामगिरीचे कौतुक केले. तो कौतुकाचे दोन शब्दच नाही बोलला, तर सिंधूला 80 लाखांच गिफ्ट दिलं.
4 / 6
नागार्जुनने सिंधूला BMW X5 ही महागडी गाडी गिफ्ट दिली आहे. यावेळी सिंधूचे प्रशिक्षक पी गोपिचंदही उपस्थित होते. माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या हस्ते BMW नं नुकतेच या गाडीचे लाँचिंग केले होते.
5 / 6
सिंधूनं सध्या सुरू असलेल्या चीन ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत विजय मिळवला. तिनं 2012च्या ऑलिम्पिक विजेत्या ली झ्युएरूईचा 21-18, 21-12 असा पराभव केला.
6 / 6
सिंधूनं सध्या सुरू असलेल्या चीन ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत विजय मिळवला. तिनं 2012च्या ऑलिम्पिक विजेत्या ली झ्युएरूईचा 21-18, 21-12 असा पराभव केला.
टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूTollywoodTollywoodbollywoodबॉलिवूडBmwबीएमडब्ल्यू