शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तेजपत्ता सौंदर्य वाढविण्यासाठी ठरतो उपयुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 7:14 PM

1 / 6
मसाल्याच्या पदार्थांमध्ये समाविष्ठ होणाऱ्या तेजपत्त्याचा उपयोग भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी करण्यात येतो. तेजपत्त्याचे उत्पादन सिक्किम, हिमालय, मणिपूर आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांमध्ये घेतलं जातं. तेजपत्त्याच्या झाडाची पानं तोडून ती उन्हामध्ये सुकवण्यात येत असून त्या सुकलेल्या पानांनाच तेजपत्ता म्हणतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? तेजपत्त्याचा उपयोग फक्त जेवणातच नाही तर सौंदर्यासाठीही करता येतो. यामधील पोषक तत्व त्वचा आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया तेजपत्त्याचे सौंदर्यवर्धक फायदे...
2 / 6
चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी तेजपत्ता लाभदायक ठरतो. तेजपत्त्याचा लेप किंवा तेजपत्ता घालून उकळलेल्या पाण्याचा वपर करून चेहरा धुवा. चेहऱ्यावरील डाग दूर होण्यासोबतच तजेलदार दिसण्यास मदत होईल.
3 / 6
सुर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा उजळवण्यासाठी तेजपत्ता मदत करतो.
4 / 6
केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच कस मुलायम आणि चमकदार करण्यासाठी तेजपत्ता उपयोगी ठरतो. तेलामध्ये तेजपत्त्याची पानं टाकून उकळून केसांच्या मुळांना तेलाने मसाज करा. केस धुण्यासाठी तेजपत्त्याचं पाणीही वापरू शकता.
5 / 6
तेजपत्त्याचा लेप तयार करून केसांना लावल्याने कोरड्या केसांची समस्या दूर होते. दह्यामध्ये मिक्स करून तुम्ही हा हेयर पॅक म्हणून वापरू शकता. त्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केसांच्या समस्या दूर होतात.
6 / 6
तेजपत्त्याची पानं सुकवून त्याची पावडर तयार करा. तयार पावडर दंतमंजन म्हणून वापरा. दातांचा पिवळेपणा दूर होऊन दात चमकदार होण्यास मदत होईल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स