आजकाल लोक 'हेल्थ कॉन्शिअस' म्हणजे आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. व्यायाम आणि पोषक आहाराला ते महत्त्व देतात. इतके असूनही काही ना काही कारणांमुळे बर्याचदा आपल्याकडून अनहेल्थी पदार्थ खाल्ले जातात. आणि मग दुसर्या दिवशी आपण त्याचावर विचार करत बसतो. परंतु स्ट्रिक्ट डाएट प्लॅन असूनही आपण गरजेपेक्षा जास्त का खातो या मागे काही कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारणे म्हणजे :१. मित्रमित्रमंडळी म्हटले की दिवसभर अचरबचर खाणे आलेच. गप्पा-गोष्टींच्या ओघात मग समोसे, कचोरी, बर्गर, पिझ्झा तर मागावलाच जातो. आता मित्रांना कसे नाही म्हणणार या भीतीमुळे कळत-नकळत आपण आरोग्यास नुकसानदायी पदार्थ खातो. पण स्वत:च्या तब्येतीची काळजी जास्त महत्त्वाची. मित्रांना खरे कारण सांगा. ते नक्कीच समजून घेतील.२. थकवाबरेच लोक थकवा आला म्हणजे भूक लागली अशी गफलत करतात. अपुर्या झोपेमुळेदेखील थकवा जाणवू शकतो. त्यामुळे दररोज ६-८ तास झोप अत्यंत गरजेची आहे. तसेच लक्ष द्या की दिवसाच्या कोणत्या वेळेला तुम्हाला असा थकवा जाणवतो. याचा पॅटर्न समजला तर जंक फुड खाण्यावर तुम्ही लगाम लावू शकता.३. घाईमध्ये खाणेजे लोक घाईघाईमध्ये जेवण करतात ते गरजेपेक्षा जास्त खातात. जर तुम्ही १0 मिनिटांच्या आत ताटावरून उठत असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. आरामशीर, कसलीही घाई न करता, एक-एक घास चावत खा. त्यामुळे पचनही चांगल्या पद्धतीने होते.४. बोअर होणेकाही सुचतच नाहीए, एकदम बोअर होतय, काही करायलाच नाही म्हणून किती तरी लोक उगीच गरज नसताना खातात. जगातील सगळ्यात जास्त लोक हे कंटाळा आला म्हणून खातात आणि ओव्हरइटिंगचे शिकार होतात. त्यामुळे स्वत:ला कामात व्यस्त ठेवून अशा वाईट सवयीपासून स्वत:ला दूर ठेवा.५. पाण्याचे प्रमाण कमीशरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले तर आपल्या तहानभूक जास्त लागते. त्यामुळे सदैव पाण्याची बॉटल जवळ ठेवा. दिवसभरातून अधूनमधून सतत पाणी पित राहा. जेवणाआधी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. झोपताना आणि उठल्यावरही पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.