शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लॉकडाऊनमध्ये वाढलेले केस नको झालेत?, या ट्रिक्स वापरून घरच्याघरी हेअरकट करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 6:30 PM

1 / 11
सध्या कोरोना व्हायसरने जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नाहीत. अशात पार्लर आणि सलून बंद असल्यामुळे लोकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
2 / 11
वाढलेले केस कधी एकदा कापतोय असं पुरुषांना झालं आहे. तुम्ही सुद्धा याच समस्येचा सामना करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहोत.
3 / 11
क्रु कट- डोक्याच्या दोन्ही बाजूंचे आणि मागचे केस कापण्यासाठी तुम्ही क्लिपर गार्डचा वापर करू शकता. याशिवाय फ्रंट कटसाठी मिडीयम क्लिपरचा वापर करू शकता.
4 / 11
फेड हेअर कट- हा कट खूप फेमस आहे. हा कट घरी करत असताना तुम्हाला सावधगिरी बाळगायला हवी. जर तुम्हाला क्लिपर गार्डची माहिती असेल तर तुम्ही हा कट करू शकता.
5 / 11
आर्मी कट- गरमीच्या वातावरणात आर्मी कट परफेक्ट ठरतो. त्यासाठी तुम्ही कैची आणि ट्रिमरचा वापर करून केस बारिक करू शकता.
6 / 11
सिंपल हेअर कट- तुम्हाला तुमच्या केसांवर कोणतेही एक्सपरिमेंट करायचे नसतील तर फक्त केसांना ट्रिम करा.
7 / 11
रेग्युलर कट - रेग्युलर कट तुम्ही घरच्याघरी सुद्धा करू शकता. फक्त त्यासाठी कैची आणि ट्रिमरची आवश्यकता तुम्हाला असेल.
8 / 11
शॉर्ट हेअर- तुमचे केस वाढले असतील तर आधी केस किती कापायचे आहेत हे ठरवून मग हवे तितके शॉर्ट करा.
9 / 11
कोहोली कट- काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अनुष्का कैचीने केस कापत होती. तुम्ही सुद्धा यु-ट्यूबवर पाहून कैचीने केस कापू शकता.
10 / 11
मास्टर ब्लास्टर हेअरकट - सचिन सुद्धा आपले केस कैचीने कापताना सोशल मीडियावर दिसून येत आहे.
11 / 11
(image credit- menshairstayletrends.com)
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स