Apply these steps to face cleanup at home like parlour
आता घरीच करा पार्लरप्रमाणे क्लीनअप; चेहरा उजळेल झटपट By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 7:29 PM1 / 7सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये दररोज धूळ, ऊन आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो. यामुळे फेस क्लीनअप करण्याची गरज असते. पंरतु यासाठी वेळ देणं फार अवघड काम असतं. अशातच पार्लरमध्ये जाणं शक्य होत नसेल तर, तुम्ही घरच्या घरी फेस क्लीनअप करू शकता. घरच्या घरी पार्लरसारखं क्लीनअप करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता. 2 / 7पहिली स्टेप्स - घरच्या घरी फेस क्लीनअप करण्यासाठी सर्वात आधी चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. त्यानंर फेसवॉश किंवा क्लीजिंग मिल्कचा वापर करा. 3 / 7दुसरी स्टेप - त्यानंतर एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा थंड दही एकत्र करा. त्यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस त्यामध्ये एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होते. तसेच त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. 4 / 7तिसरी स्टेप - उन्हाळ्यामध्ये ओपन पोर्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे पोर्स बंद करण्यासाठी संपूर्ण चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा. हे अत्यंत फायदेशीर आहे. 5 / 7चौथी स्टेप - चेहऱ्यावर मुलतानी माती, चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून लावा. काही वेळानंतर फेस स्वच्छ धुवून घ्या. हा पॅक स्किन टाइटनिंगसाठीही काम करतो. 6 / 7 पाचवी स्टेप - फेस पॅक लावल्यानंतर थोडंसं कोरफडीचं जेल लावा. तुमचं फेस क्लीनअप पूर्ण होईल. 7 / 7टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications