avoid these foods to look young
दिसायचंय चिरतरुण?; मग 'या' पदार्थांपासून राहा सदैव दूर By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 3:57 PM1 / 7आपण कायम तरुण दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. आपल्याकडे पाहून कोणालाही आपलं वय कळू नये, असं वाटणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र त्यासाठी तुम्ही खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवं.2 / 7मार्जरिन- काही जण मस्क्याला पर्याय म्हणून मार्जरिन खातात. त्यात ट्रान्स फॅट असतं. यामुळे शरीरातल्या हायड्रेशनचं प्रमाण बिघडतं. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकत्या पडू लागतात. 3 / 7पॅक्ड फूड- धकाधकीच्या जीवनात अनेकदा हातात पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात पॅक्ड फूडचं प्रमाण वाढतं. त्यात तेलाचं आणि मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो.4 / 7मीठ- अनेकजण जास्त मीठ खातात. यामुळे रक्तदाब वाढतो आणि शरीरावर प्रतिकूल परिणाम दिसू लागतात. 5 / 7एनर्जी ड्रिंक- काही जण दिवसातून अनेकदा एनर्जी ड्रिंक घेतात. एनर्जी ड्रिंकमध्ये साखर, कॅफेन, सोडियमचं प्रमाण जास्त असतं. त्याचा परिणाम शरीरावर होतो. 6 / 7गोड पदार्थ- गोड पदार्थांमुळे वजन वाढतं. शरीराची वाटचाल वेगानं वृद्धत्वाच्या दिशेनं सुरू होते. 7 / 7ब्रेड, पास्ता- अनेकांना ब्रेड, पास्ता यासारखे पदार्थ आवडतात. यामुळे शरीरातल्या साखरेचं प्रमाण वेगानं वाढतं. जास्त मैदा खाल्ल्यास चेहऱ्यावर सुरकत्या पडू लागतात. त्यामुळे मैद्यापासून तयार करण्यात आलेल्या ब्रेडऐवजी गव्हाच्या ब्रेडचा वापर करावा. आणखी वाचा Subscribe to Notifications