सेलिब्रिटींच्या चेहऱ्याची त्वचा पाहिली की, आपली त्वचाही त्यांच्यासारखीच ग्लोविंग आणि तेजस्वी असावी असे वाटते. तशी त्वचा मिळविण्यासाठी आपण खूप प्रयत्नही करतो. महागडे सौंदर्य प्रसाधने वापरतो, तासंतास ब्यूटी पार्लरमध्ये वेळ घालवितो, मात्र अपेक्षित फायदा होत नसतो. बाह्य वातावरण, प्रदुषण याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा निस्तेज आणि सावळी होते. काही तज्ज्ञांच्या मते, चेहऱ्याच्या त्वचेला सावळापणा हा फक्त वातावरण आणि प्रदुषणामुळेच येत नसून काही खाद्यपदार्थांच्या अति सेवनानेही येतो. काही पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्याने ब्लड वेसल्स आकुंचन पावतात शिवाय स्किन सेल्सवर निगेटिव्ह परिणाम होतो त्यामुळे चेहऱ्याचा रंग सावळा होतो. जाणून घेऊ त्या पदार्थांबाबत...! * मीठ-मिठाचे अति सेवन त्वचेसाठी घातक आहे. यामुळे ब्लड शूगर लेवल वाढते आणि त्यामुळे स्किन टिश्यूज म्हणजे कोलेजनचे नुकसान होते, ज्याचा परिणाम त्वचेचा फेयरनेस कमी होऊ लागतो.* कॉफी-कॉफीच्या अति सेवनाने त्वचा सावळी होऊ शकते. कॉफीतील कॅफीनमुळे स्ट्रेस हार्मोन म्हणजे कार्टिसोलची मात्रा वाढते ज्यामुळे कॉम्प्लेक्शन डार्क होते आणि त्वचा सावळी होते. * मद्यपान-मद्यपान केल्याने यूरिन जास्त प्रमाणात होते ज्यामुळे शरीराचे पाणी कमी होते. याचा परिणाम म्हणजे स्किनच्या टिश्यूजला हानी पोहचते आणि रंग सावळा होतो. * पांढरे ब्रेड-याच्या अति सेवनाने इंसुलिनचे प्रमाण वाढते ज्यामुळे स्किनमध्ये आॅइलची निर्मिती जास्त प्रमाणात होते आणि त्वचेचे फेअरनेस कमी होतो. * स्पाइसी फूड-स्पाइसी फूडच्या अति सेवनाने शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे ब्लड वेसल्स पसरतात आणि त्वचेचा सावळापणा वाढतो.