आपण पाहत असाल सध्या फिल्म इंडस्ट्रिमध्ये फुल दाढीची क्रेझच सुरु झाली आहे. बऱ्याच चित्रपटात अभिनेत्यांची फुल दाढी पाहावयास मिळाली आहे. फुल दाढीमुळे लुक तर हटके दिसतोच शिवाय व्यक्तिमत्त्वदेखील रुबाबदार वाटते. चित्रपट वगळता आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही बरेच सेलिब्रिटी फुल दाढीवरच वावरत असतात. फुल दाढी ठेवणे फॅशनच नव्हे तर त्वचेसाठीदेखील फायदेशीर आहे, यामुळेच कदाचित सेलिब्रिटी फुल दाढी ठेवत असतील. जाणून घेऊया फुल दाढी ठेवण्याचे फायदे. फुल दाढी ठेवण्यामुळे त्वचेसंदर्भात कित्येक समस्या कमी होतात हे वैद्यकियदृष्टया सिद्ध झाले आहे. * घातक अतिनिल किरणांपासून संरक्षण उन्हाळ्यातील अतिनिल किरणांपासून फुल दाढीमुळे त्वचेचे संरक्षण होते. त्यामुळे त्वचेच्या कॅन्सरपासूनही बचाव होतो, शिवाय टॅनिंगची समस्या कमी होते. * त्वचेचा ओलावा कायमबाहेरील हवेमुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी होते. मात्र फुल दाढीमुळे त्वचेचा ओलावा कायम राहण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा सॉफ्ट राहते. दाढीमुळे चेहऱ्याच्या त्वचेचा रुक्षपणा कमी होतो ज्यामुळे भविष्यात चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. * संक्रमणापासून बचावदाढी असल्याने एअरबॉर्न बॅक्टेरिया तोंडात जाऊ शकत नाही, त्यामुळे गळ्याच्या संक्रमणाची भीती नसते. शिवाय हिवाळ्यात थंडीपासूनही बचाव होतो. विशेष म्हणजे दाढीमुळे शरीराचे तापमान मेंटेन राहते ज्यामुळे पॉलेन अॅलर्जी, सर्दी, खोकला, अस्थमा आदी समस्या कमी होतात. * सुरुकुत्या पडत नाहीदाढीमुळे चेहऱ्यावर धुळ आणि मातीचा परिणाम होत नाही, त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो आणि सुरकुत्या होत नाहीत. * तारुण्य टिकण्यास मदतदाढी ठेवल्याने चेहऱ्याच्या सेबेसियड ग्लॅड्स झाकलेले असतात. यांच्यामधून ओलावा टिकून ठेवणारे तेल निघते, ज्यामुळे एजिंगची समस्या नष्ट होते. Also Read : Beauty : फुल दाढी येण्यासाठी लिंबूचा असा करा वापर ! Beauty Tips : रुबाबदार दाढीसाठी सेलिब्रिटीदेखील करतात हे उपाय !