-रवींद्र मोरे साउथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक स्टायलिश पर्सनॅलिटी म्हणून श्रुती हासनची ओळख झाली आहे. तिचा आक र्षक लुक पाहून सर्वचजण चकित होत असतात. विशेष म्हणजे तिच्या या आकर्षक लुकमध्ये तिची ग्लोइंग स्किनची मोठी भूमिका आहे. श्रुती हसनने नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सौंदर्याचे गुपित सांगितले आहे. श्रुतीने सांगितले की, सुंदर दिसण्यासाठी सुरुवातीपासूनच आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायला हवी. यासाठी ती नियमित स्क्रबचा वापर करते आणि भरपूर पाणी पिते. स्किनकेयरसाठी या रुटीनला दररोज फॉलो केल्यास आपले सौंदर्य खुलण्यास मदत होते. सुंदर दिसण्यासाठी आपण बरेच महागडे सौंदर्य प्रसाधने वापरतो, मात्र मॉइश्चरायजिंग सारख्या बेसिक गोष्टी आपण विसरतो. मात्र श्रुती अशा बेसिक गोष्टींकडे विशेष लक्ष देते. सोबतच मुंबईतील प्रदुषणापासून वाचण्यासाठी ती चारकोल मास्कचा वापर करते. यासाठी आपण चारकोल पावडरचाही वापर करु शकता, कारण ते स्वस्थ आणि सहज उपलब्ध होते, असाही सल्ला तिने दिला आहे. बऱ्याचदा आपण परफेक्ट दिसत नसतो किंवा आतुन आपण परफेक्ट फिल नाही करत, अशावेळी आपला सकारात्मक विचार खूप कामास येतो, म्हणून आपण सुंदर दिसण्यासाठी सकारात्मक असणेही गरजेचे आहे, असेही ती म्हणते.श्रुतीने कान्स फिल्म फेस्टिवलचा अनुभव घेतला. त्याठिकाणी एकाचवेळी एवढ्या फॅशनेबल पर्सनॅलिटी पाहून ती चकित खूप आनंदीही झाली. याठिकाणीही तिचा लुक पाहण्यासारखा होता. Also Read : Beauty Tips : प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा ! : Shock: पोस्टर लॉन्च झाल्यावर श्रुती हासनने सोडला ‘संघमित्रा’!