Corona virus : How to get glowing skin by using home remedies myb
Corona virus : कोरोनाच्या भीतीने पार्लरला जात नसाल, तर 'ही' सोपी ट्रिक देईल ग्लोईंग त्वचा By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 5:11 PM1 / 10सध्या कोरोना व्हायरसचे संक्रमण जगभरासह महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कोरोनाची लागण होऊ नये. यासाठी अनेक खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. अशाच अनेकांना ऑफिसला सुट्टी देण्यात आली आहे. सरकारी कार्यालयं बंद आहेत. 2 / 10अशात महिलांना पार्लरला तर जावचं लागणार कारण नेहमीचं क्लीन अप, फेशियल करायचं असंत. पण तुम्हाला माहित आहे का पार्लरला सुद्धा तुमच्या त्वचेवर ज्या साहित्याचा वापर केला जातो. ते साहित्य ए़काचवेळी अनेक लोक वापरत असतात. 3 / 10त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हा्ला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही पार्लरला न जाता घरच्याघरी सुंदर त्वचा मिळवू शकता. कारण महिला या आपली त्वचा आणि चेहरा याबाबत खूप जागरूक असतात.4 / 10१) सगळ्यात आधी कापसाचा तुकडा घ्या. त्या कापडावर क्लिंजीन मिल्क किंवा मेकअप रिमुव्हर लावा. मग त्वचेवरून हलक्या हाताने पुसून घ्या.5 / 10२) लोशन किंवा क्लिंजर घेऊन त्वचेवर लावा आणि मसाज करा. मसाज करताना खालूनवर करा.6 / 10३) मग स्टिमरचा वापर करून त्वचेवर वाफ घ्या. त्यामुळे त्वचेवरील पोर्स ओपन होतील आणि चेहरा क्लिन होईल. नंतर त्वचेवर घाम आल्यानंतर मऊ कापडाने पुसून घ्या.7 / 10४) त्यानंतर नाकावरील, हनूवटीवरील ब्लॅकेट्स रिमुव्ह करा. हे क्रिया वाफ घेतल्यानंतर लगेचंच करा नाहीतर पोर्स टाईट होतील.8 / 10५) मग त्वचेवर फेसपॅक लावा. कोणताही एलोवेरा, फ्रुट्स किंवा चंदनाचा फेस पॅक तुम्ही लावू शकता. तुमच्या त्वचेवर काळपटपणा आला असेल तर तुम्ही डी टॅन चा फेस पॅक लावून त्वेचवरील काळपटपणा घालवू शकता.9 / 10या उपायांचा वापर करून तुम्ही पार्लरला न जाता घरच्याघरी उजळदार त्वचा मिळवू शकता. 10 / 10या उपायांचा वापर करून तुम्ही पार्लरला न जाता घरच्याघरी उजळदार त्वचा मिळवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications