शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे?; 'हे' 5 उपाय करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 11:11 AM

1 / 8
भेगाळलेल्या टाचा म्हणजे, तरूणी आणि महिलांसाठी एक समस्याच... यामुळे अनेकदा स्टायलिश फुटवेअर्सना बाय-बाय करत, टाचा झाकून जातील अशा फटवेअर्सचा वापर करावा लागतो. चुकून जर ऑफिस किंवा एखाद्या समारंभामध्ये स्टायलिश फुटवेअर्स वेअर केल्याच तर मात्र आपल्या टाचांना पडलेल्या भेगा लपवण्यासाठी कसोशीने महिला प्रयत्न करत असतात.
2 / 8
सध्या पावसाळा सुरू असून या दिवसांमध्ये पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पावसाळ्यात वातावरणात ओलावा वाढतो. अशा दिवसांमध्ये अनेक आजार आपली डोकी वर काढतात. एवढचं नाहीतर अनेक घातक बॅक्टेरियाही पसरतात. असातच जर पायांना भेगा पडलेल्या असतील तर इन्फेक्शन होण्याचा धोका आणखी वाढतो. यामुळे पायांना जखमही होऊ शकते. तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल तर अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी सहज या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता.
3 / 8
एका टबमध्ये किंवा बादलीमध्ये गरम पाणी घ्या. यामध्ये एक टेबलस्पून मीठ, अर्धा कप लिंबाचा रस, दोन टेबलस्पून ग्लिसीन, दोन टेबलस्पून गुलाब पाणी एकत्र करा. पायांना जवळपास 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करा. टाचांच्या भेगा दूर करून मुलायम करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करणं फायदेशीर ठरतं.
4 / 8
बदाम आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये शुष्क त्वचा मुलायम करण्यासाठी आवस्यक असणारे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी या तेलांचा वापर करून मालिश करा आणि त्यानंतर पायांमध्ये सॉक्स घाला. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल.
5 / 8
केळ्याला एका बाउलमध्ये घेऊन व्यवस्थित स्मॅश करून घ्या. आता गरम पाण्याने पाय स्वच्छ करून घ्या. त्यानंतर तयार पेस्ट पायांच्या भेगांवर लावा. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही या पेस्टमध्ये गुलाब पाणीही एकत्र करू शकता. दहा ते वीस मिनिटं पायांना पेस्ट लावून ठेवा. त्यानंतर पाय धुवून टाका.
6 / 8
व्हॅसलिनमध्ये इतर मॉयश्चरायझरपेक्षा त्वाच मुलायम करण्यासाठी आवश्यक असणारे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे कोरड्या त्वचेसाठी व्हॅसलिन नेहमीच फायदेशीर ठरतं. व्हॅसलिनच्या मदतीने टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी सर्वात आधी पाय गरम पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर पाय कोरडे करून त्यावर व्हॅसलिन लावून सॉक्स वेअर करा. दोन ते तीन दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल.
7 / 8
एका अर्धा बादली गरम पाण्यामध्ये अर्धा कप मध एकत्र करून पाण्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर जवळपसा 10 ते 20 मिनिटांसाठी पाय या पाण्यामध्ये बुडवून ठेवा. यादरम्यान प्यूमिक स्टोनच्या मदतीने पायाच्या टाचांना हलक्या हाताने रब करा. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करा. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल.
8 / 8
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीMonsoon Specialमानसून स्पेशलBeauty Tipsब्यूटी टिप्स