पुरुषांची पर्सनॅलिटी खुलविण्यासाठी त्यांची हेअरस्टाइल महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून बहुतांश तरुण वेगवेगळी हेअरस्टाइल अप्लाय करत असतो. त्यानुसार मार्केटमध्येही नवनवीन हेअरस्टाइलचा ट्रेंड पाहावयास मिळतो. सध्या याच फॅशन ट्रेंडमध्ये पाच हेअरस्टाइल जास्तच पॉपुलर होताना दिसत आहेत. जाणून घेऊया त्याबाबत... * द बज कट एकदम लहान लहान केस बऱ्याचजणांना आवडत नाही. मात्र यावर्षी याचाही ट्रेंड पाहावयास मिळाला. बज कटचे अजून एक वैशिष्टे म्हणजे या केसांची लांबी खूपच कमी असल्याने सकाळी आपल्या केसांना मेंटेन करण्यास जास्त वेळ लागत नाही. * लॉँग हेअर लांब केसांची फॅशन कधीही जात नाही. गेल्या चार-पाच दशकांपासून या हेअरस्टाइलची के्रझ सुरु आहे आणि लोकांना ती आवडतेही आहे. मात्र लांब केस सर्वचजण ठेऊ शकत नाहीत. लांब केसांची खूपच काळजी घ्यावी लागते. केसांची लांबी किती असावी, हे आपल्या चेहऱ्याच्या आकारावर अवलंबून असते. * स्लिक्ड बॅक सध्या ‘स्लिक्ड बॅक’ हेअरस्टाइल टॉप ट्रेंड बनलेली आहे. ही हेअरस्टाइल खूपच साधारण असून यात केस लहान आणि सर्व मागच्या बाजूने असतात. ही हेअरस्टाइल बनविताना जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ही जास्त स्टायलिश मानली जाते. कॅज्यूअल असो किंवा फॉर्मल, प्रत्येक ड्रेसमध्ये ही हेअरस्टाइल आकर्षक वाटते. आपणासही अशी हेअरस्टाइल अप्लाय करायची असेल तर कंगवा घेऊन केसांना मागच्या बाजूला करावे. यासाठी आपण हवे तर जेलचा वापर करु शकता. * द क्विफ डोक्याचा मागिल भाग आणि दोन्ही कानाच्या साइडला खूपच कमी केस आणि वरच्या बाजूला मोठे केस अशा हेअरस्टाइलला क्विफ स्टाइल म्हणतात. या हेअरस्टाइलला जास्त स्टायलिश मानले जात नाही, तरीही सेलिब्रिटी आणि सामान्य व्यक्ती बरेचजण या स्टाइलला फॉलो करीत आहेत. * द फ्रेंच क्रॉप१९९० मध्ये प्रसिद्धीस आलेली ही हेअरस्टाइल काही वर्ष दिसेनासी झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षापासून लोकांनी पुन्हा अप्लाय करणे सुरु केले आहे. प्रत्येक बाजूने लहान केस दिसणारा हा लुक फॉर्मल दिसतो. आॅफिस जाणाऱ्यांसाठी हा लुक एकदम परफेक्ट आहे. Also Read : Smart Tips : पुरुषांनो, काळानुसार स्मार्ट दिसायचे आहे ना? मग असा करा स्वत:मध्ये बदल !