-Ravindra Moreआपल्या वार्डरोबमध्ये कितीही कलर्स असोत मात्र त्यात लाल रंगाचा समावेश नसेल तर आपला वार्डरोब अपूर्णच वाटेल. तसे लाल रंगाला महिलांच्या आयुष्यात तर वेगळेच महत्त्व आहे. या रंगाचे ड्रेस फक्त विवाहित महिलाच नव्हे तर हा रंग सर्वांसाठीच बनला आहे. लहान मुलगा असो की वयस्कर, प्रत्येकजण या रंगाच्या वस्त्राने सुंदर दिसतो. चला मग जाणून घेऊया की, लाल रंगाच्या कोणकोणत्या एक्सेसरीजने आपले वॉर्डरोब परफेक्ट बनू शकते.* ड्रेस सहसा लाल रंग जास्त कुणाला आवडत नाही, मात्र आम्ही आपणास सल्ला देऊ इच्छितो की, जर आपणास स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसायचे असेल तर लाल रंगाला आपल्या वॉॅर्डरोबमध्ये स्थान द्या. कॅज्युअल ड्रेसेसपेक्षा लाल रंग खूपच स्टायलिश लुक देतो. * हील्सफक्त ब्लॅक आणि ब्राउन स्लीपर्सचा वापर करणे आता जुने झाले आहे. आपल्याला स्टायलिश लुक देण्यासाठी रेड कलर्सची स्लीपर्स किंवा हील्स ट्राय करा. याने आपल्याला ग्लॅम लुक तर मिळेलच शिवाय आपल्या आत्मविश्वासात भर पडेल. * ज्वेलरी लाल रंग आपणास फॅमिनाइन लुक देतो. यासोबतच एक्सेसरीजदेखील लाल रंगाची असेल तर नक्कीच आपला लुक इतरांपेक्षा वेगळा दिसेल आणि आपण गर्दीतही उठावदार दिसाल. थोड्या पैशांची बचत करुन लाल रंगाची ईयरिंग्ज खरेदी करा आणि पाहा * पर्सआपण पार्टीत असो की लग्नात आपण पर्स वापरतोच, कारण याने आपल्या व्यक्तिमत्त्वात वेगळाच बदल दिसून येतो. त्यातच जर ही छोटीसी दिसणारी पर्स लाल रंगाची असेल तर आपल्या लुकमध्ये खूप बदल होऊन आपण इतरांपेक्षा वेगळे दिसाल. * हेयरआपण आपल्या हेअरस्टाइलला बोअर झाले असतील आणि आपणास नवा आणि हटके लुक हवा असेल तर आपल्या केसांना लाल रंग देऊ शकता. काही केस किंवा फक्त हायलाईट करणेदेखील चांगला पर्याय आहे. आपल्या बोरिंग लुकला हा लाल रंग स्टायलिश अंदाज नक्की देईल.