Home remedies best for bathing
आंघोळ करताना साबणाऐवजी वापरा हे पदार्थ.... मग बघा कमाल By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 3:48 PM1 / 7हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी अंघोळ करणं गरजेचे आहे. अंघोळ करण्यासाठी पुरूष तसेच महिला या वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. पण घरच्या घरीच साबणाचा वापर न करता काही घरगुती वस्तु अंघोळीच्या पाण्यासोबत वापरून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.2 / 7गुलाबजल हे डोळ्यांसाठी उत्तम असते. त्याचप्रमाणे शरीरासाठी सुध्दा उपयुक्त असते. आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल मिसळून लावल्यास त्वचा उत्तम राहते.3 / 7खोबरेल तेलामुळे त्वचा मऊ राहते. यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात. यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही. एका बादलीत दोन चमचे टाकून ते पाणी आंघोळीसाठी वापरावे.4 / 7ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई असते. यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. हे एका बादलीत अर्धा चमचा टाकावे.5 / 7आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास थकवा आला असल्यास शरीराला आराम मिळतो. आणि अंगदुखी दूर होते.6 / 7आठवडयातुन दोनदा दुधात बेसनाचे पीठ मिसळून पेस्ट तयार केला. यामुळे त्वचेतील रुक्षपणा निघून जाईल. आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होईल.7 / 7आंघोळीच्या पाण्यात ग्रीन टी च्या ४ ते ५ बॅग्स टाकून ते दहा मिनीट भिजवत ठेवा. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. या पाण्यात डिटॉक्सीफायर गुण असतात. ते त्वचेला स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications