home remedies for facial mole removal
सर्जरी नाही तर 'या' घरगुती उपायांनी दूर करा चेहऱ्यावरील तीळ! By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 6:17 PM1 / 9चेहऱ्यावर एक किंवा दोन तीळ येणं ही साधारण गोष्ट आहे. परंतु हे तीळ जास्त दिसू लागतात त्यावेळी चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. चेहऱ्यावर जागोजागी आलेल्या तीळांमुळे कोणत्याही वेदना नाही होत परंतु हे दिसायला फार विद्रुप दिसतात. काही लोक हे हटविण्यासाठी सर्जरी करतात. परंतु काही घरगुती उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरील तीळांपासून सुटका करून घेऊ शकता. 2 / 9लसणाच्या पाकळ्या बारिक करून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावरील तीळांवर लावा. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने हे कव्हर करा. रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी पाण्याने धुवून टाका. आठवडाभरामध्ये 3 वेळा या पेस्टचा वापर करा. यामुळे तुमची नको असलेल्या तीळांपासून सुटका होईल. 3 / 9फ्लॉवरचा रस काढून तो दररोज तीळ असलेल्या जागेवर लावल्याने तीळ नाहीसे होण्यास मदत होते. 4 / 9थोडीशी मध आणि सुर्यफुलाच्या बीयांचं तेल एकत्र करून लावल्याने तीळ नाहीसे होण्यास मदत होते. 5 / 9 बेकींग सोड्यामध्ये एरंडेल तेल मिक्स करून लावल्याने तीळा नाहीसे होतात.6 / 9कांद्याचा रस आणि सफरचंदाचे व्हिनेगर एकत्र करा आणि तीळावर लावा. रात्रभर ठेवा आणि सकाळी पाण्याने स्वच्छ करा. काही महिने असं केल्याने तीळ नाहीसे होण्यास मदत होईल.7 / 9सफरचंदाचं व्हिनेगरमध्ये बुडवा आणि तीळावर लावा. त्यानंतर त्यावर टेप किंवा बॅन्डेज लावा. 5 ते 6 तासांनंतर पाण्याने चेहरा धुवा. 8 / 9कॉटनवर थोडंसं टी-ट्री एसेंशिअल ऑइल लावा, त्याने त्वचेवरील तीळ नाहीसे होण्यास मदत होईल. 9 / 9मुळ्याची एक पातळ स्लाइस कापून तीळावर ठेवा. असं काही आठवडे केल्यामुळे तीळ नाहीसा होण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications