Home remedies for sun tan
उन्हामुळे पाय काळसर झालेत ? नक्की करा हे घरगुती उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 6:29 PM1 / 6उन्हाळ्यात चेहऱ्यासोबतच हातांची व पायांची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. उन्हाळ्यात आपण चप्पल घालतो तेवढा भाग वगळता काही भाग काळसर पडतो. याच समस्येवर काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 2 / 6१) लिंबाचे दोन भाग करून त्यापैकी एक भाग काळसर झालेल्या ठिकाणी चोळून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. ही कृती दिवसातून दोनदा केल्याने फरक दिसेल3 / 6२) टोमॅटो आणि कोरफडीचा गर पायांना लावल्यास पायांची त्वचा तजेलदार दिसते व काळसरपणा निघून जाईल.4 / 6३) ताकामध्ये गरम पाणी व ओट्स मिश्रित करून या मिश्रणाने पाय धुवा त्यामुळे पाय उजळ दिसतील 5 / 6४) चमचाभर दही पायांवर टाकून १० ते १५ मिनिटे मसाज करा. यामुळे उन्हामुळे काळसर झालेले पाय पूर्वीसारखे दिसतील.6 / 6५) बटाट्याच्या कापांमध्ये दूध मिश्रित करा. काही वेळाने कापा पायांवर चोळा. लगेचच फरक दिसून येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications