शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पांढऱ्या केसांना 'अशी' मेहेंदी लावून फक्त काळेभोरच नाही चमकदार, लांब केस मिळवा....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 3:02 PM

1 / 10
केसांमध्ये नैसर्गिक चमक येण्यासाठी मेहेंदीचा वापर केला जातो. बदलत्या जीवनशैलीत त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांना सामना महिलांसह पुरूषसुद्धा करत असतात. केसांवर कोणताही प्रयोग करण्याआधी आपण घाबरत असतो. कारण कोंडा झाला तर. केस गळायला लागले तर अशा अनेक शंका आपल्याला येत असतात.
2 / 10
तुम्ही केसांना मेंहेंदी लावताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर नक्कीच तुमचे केस लांब काळेभोर होतील. केस दुप्पट चांगले दिसतील. भिजवलेल्या मेहेंदीत एक चमचा दही आणि अंड घाला आणि हे मिश्रण केसांना लावा. ४५ मिनिटं केस असेच राहू द्या . त्यानंतर थंड पाण्याने केस धुवून टाका.
3 / 10
मेहंदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचा वापर सौदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. त्यातील उपयुक्त घटकांमुळे केसांविषयक औषध किंवा तत्सम वस्तुंमध्ये मेहेंदीचा मोठा वापर केलेला आढळतो. तसंच तुम्ही दूध सुद्धा मेहेंदीमध्ये घालू शकता. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील.
4 / 10
मेहेंदी लावताना डोळ्यात गेल्यास त्वरीत थंड पाण्याने डोळे धुवावेत. कोणत्याही प्रकारे मेहंदीचा डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे चुरचुरायला लागतात आणि लालभडक होतात. जास्त त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.
5 / 10
चांगल्या प्रतीची मेहेंदी योग्य प्रमाणात योग्य वेळेसाठी भिजत ठेऊन लावल्यास ते सर्वोत्तम रिझल्टस् देते. योग्य मेहेंदीच्या नियमित वापराने केसांना चमक, दाटपणा आणि वाढ प्राप्त होते.
6 / 10
केसांमधील खाज-खुजलीची समस्या सुद्धा मेहेंदी लावल्याने दूर होते.
7 / 10
आवळ्याची पावडर मेहेंदीमध्ये घातल्यानंतर केस गळणं थांबू शकतं. केसात कोंडा असल्यास आवळ्यामुळे निघून जाण्यास मदत होईल.
8 / 10
आवश्यक तेवढे पाणी घेऊन त्यात दोन ते तीन चमचे चहा पावडर टाकून उकळवून घ्या. हे पाणी गाळून घ्या. पाणी थंड करून त्यात 2-3 चमचे मिश्रण टाका. आवश्यक तेवढी मेहेंदी टाकून लेप बनवून घ्या. हे मिश्रण लोखंडी भांड्यात रात्रभर ठेवून द्या.
9 / 10
अशा पध्दतीने मेहेंदी भिजवल्यास जास्त चांगला रिजल्ट दिसून येईल.
10 / 10
मेहंदी बनवताना काही चुकीची पध्दत वापरली गेली तर त्याचे मुळ नैसर्गिक गुणधर्म बदलतात. अशी मेहंदी केसांना लावल्याल केस शुष्क आणि राठ होतात. त्यातील ओलावा निघून जावून ते निर्जीव दिसतात. त्यामुळे मेहंदीनंतर केस धुवून, सुकवून, तेल लावून काही तासांनी पुन्हा धुवावेत.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स