शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका रात्रीत गायब होतील पिंपल्स; फॉलो करा 'या' 5 सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 1:45 PM

1 / 7
पिंपल एक अशी समस्या आहे, जी फक्त त्वचेलाच नुकसान नाही पोहोचवत तर लूक बिघडवण्याचंही काम करते. अशातच जर एखादा इव्हेंट किंवा फंक्शन अटेन्ड करायचं असेल तर, हे लपवण्यासाठी फाउंडेशन आणि अनेक मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करावा लागतो. पण जर तुम्ही काही घरगुती उपाय केले तर फक्त एका रात्रीमध्येच पिंपल्स गायब होण्यास मदत होईल.
2 / 7
कॉटन बॉलवर किंवा कॉटन स्वॅपवर थोडीशी व्हाइट टूथपेस्ट घ्या आणि पिंपल्सवर लावा. पण लक्षात ठेवा पिंपल्सवर टूथपेस्ट लावतना जास्त दाब देऊ नका. रात्रभर तसचं ठेवा. सकाळी याचा परिणाम पाहायला मिळेल. पिंपल्सची समस्या दूर झालेली असेल.
3 / 7
टी-ट्री ऑइलचे काही थेंब, एक टी स्पून ऑलिव्ह ऑइल आणि जोजोबा ऑइल एकत्र करा. चेहरा व्यवस्थित धुतल्यानंतर हे मिश्रण चेहऱअयावर लावा. यामुळे पिंपल्सची साइज कमी होण्यासोबतच त्यावरील रेडनेसही कमी होण्यास मदत होते.
4 / 7
अॅपल सायडर व्हिनेगरसोबत पाणी एकत्र करा. कॉटन बॉलच्या मदतीने हे पिंपल्स असलेल्या त्वचेवर लावा. जवळपास 10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
5 / 7
एक टीस्पून बेकिंग सोडा पाण्यासोबत एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा आणि जवळपास पाच मिनिटांनी हलक्या गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. त्यानंतर फेसवर टोनर लावा. लक्षात ठेवा की, जर बेकिंग सोडा अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्वचेवर इचिंग होत असेल तर, लगेच चेहरा स्वच्छ धुवून टाका.
6 / 7
लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या घेऊन बारिक करा. हे पाण्यासोबत एकत्र करून पेस्ट तयार करा आणि पिंपल्सवर लावा. जवळपास 10 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ करा. जर ही पेस्ट लावल्यानंतर त्वचेला खाज किंवा जळजळ होत असले तर चेहरा लगेच स्वच्छ करा.
7 / 7
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स